पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील वेळू गावाचे प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांनी दोन एकर शेताच्या बांधावर शेवग्याची लागवड केली आहे. त्या झाडांना आता चांगल्याच शेंगा आल्या आहेत.
त्यांची विक्रीसुद्धा अधिक प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी गुलाब घुले यांना त्याचा फायदा होत आहे. ‘ओडिसी शेवगा’ असा प्रकार आहे. विशेष म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या झाडाला साडेचार फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा लागल्या आहेत. सध्या ही शेती सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील वेळू गावाचे शेतकरी पुत्र गुलाब महादेव घुले यांनी शेवग्याच्या शेंगाचे वाण लावून शेवग्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. दोन एकर क्षेत्रावरील शेतीच्या बांधावर शेवग्याची ७० झाडे लावत सेंद्रिय पद्धतीने शेती केली. झाडाला आलेल्या लांबीमुळे ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या आहेत.
चवीला स्वादिष्ट, लांबीला साधारण साडेचार फूट, पातळ साल, हिरवा रंग असणार्या या शेंगांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले आणि प्रसाद गुलाब घुले यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक शेती करत आपली शेती विषमुक्त केली आहे.