गुड न्यूज ! पुण्यातील ‘या’ रस्त्यासाठी 139 कोटी रुपयाचा निधी मंजूर, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : गेल्या काही वर्षांपासून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक मजबूत करण्याला विशेष प्राधान्य दिले जात आहे. रेल्वे वाहतूक मजबूत करण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत.

मुंबई-पुणे नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू होत आहे. बुलेट ट्रेन देखील सुरू केली जाणार आहे. यासोबतच रस्ते वाहतुकीसाठी विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय, खराब झालेल्या रस्त्यांची देखील दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातही विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. अशातच आता चाकण एमआयडीसीमध्येही महत्त्वाच्या रस्त्यांसाठी शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांसाठी 139 कोटी आणि 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यांच्या निधीसाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पाठपुरावा केला होता. दिलीप मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.

दरम्यान पाटील यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून चाकण एमआयडीसी मधील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी 139 कोटी 20 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.

आता आपण चाकण एमआयडीसीतील नेमक्या कोणकोणत्या रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे हे जाणून घेणार आहोत.

कोणत्या रस्त्यांसाठी मंजूर झाला निधी ?

मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे ते पवार चौक ते एचपी चौक रस्त्याची रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

तसेच शिंदे वासुली ते मिंडेवाडी रस्ता करण्यासाठी ११ कोटी ९० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सावरदरी कमान ते भांबोली फाटा हा रस्ता तयार करण्यासाठी सहा कोटी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय, नाणेकरवाडी एमआयडीसी रोड रस्ता करणे, शिंदे गाव ते जांभवडे रस्ता करणे आणि बॉस कंपनी ते सनी कंपनी रस्ता करणे या रस्त्यांच्या कामांसाठी ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा