पुणेकरांसाठी खुशखबर….! पुणे मेट्रोचा विस्तार होणार, ‘या’ मार्गावरही सुरु होणार मेट्रो, 44.63 किलोमीटर लांबीसाठी खर्च होणार 12,000 कोटी, पहा संपूर्ण रूटमॅप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune New Metro Line News : पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे सोबतच पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या देखील अलीकडे वधारू लागली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या असलेली वाहतूक व्यवस्था तोकडी सिद्ध होत आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होतेय.

ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून अन महापालिका प्रशासनाकडून पुणे शहरात मेट्रोची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही मेट्रो मार्गाची कामे पूर्ण देखील झाली आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नुकत्याच चार दिवसांपूर्वी अर्थातच 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहरातील विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान आता पुणे मेट्रोचा आणखी विस्तार होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून नवीन मेट्रोमार्गांसाठीच्या डीपीआरला मान्यताही देण्यात आली आहे.

एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग या मार्गांवर मेट्रो चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे या नवीन मेट्रो मार्गांसाठी डीपीआर आणि सात कोटी रुपये भूसंपादनासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या नवीन मेट्रो मार्गांसाठी बारा हजार 683 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कसा आहे प्रस्तावित मेट्रोमार्ग

हाती आलेल्या माहितीनुसार, वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासाठी महामेट्रोने वनाजपासून ते चांदणी चौक असा 1.2 किलोमीटर आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी असा 11.63 किलोमीटर म्हणजेच एकूण 12.65 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. यासाठी 3609 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तसेच खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी हा २५.८६ किलोमीटर आणि पौड फाटा-वारजे-माणिकबाग हा ६.११ किलोमीटर असा एकूण ३१.९८ किलोमीटर लांबीचा नवा मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. यासाठी 9 हजार 74.24 कोटीचा खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या दोन्ही मार्गांसाठी महापालिकेकडे डीपीआर सादर झाला आहे.

या डीपीआरला महापालिकेमध्ये स्थायी समितीकडून मंजुरी देखील मिळाली आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या मुख्य सभेत आता या मेट्रो मार्गांचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाकडून या प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गांसाठी मंजुरी घेतली जाणार आहे.

दरम्यान या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रोमार्गांसाठी 20 टक्के निधी केंद्रशासन आणि 20 टक्के निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. तसेच 60 टक्के निधी हा कर्जाच्या माध्यमातून महा मेट्रोला उभारावा लागणार आहे. महापालिका फक्त भूसंपादनासाठी खर्च करणार आहे. भूसंपादनासाठी मात्र सात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.