आनंदाची बातमी ! पुण्यात विकसित होणार नवीन बसस्थानक ; कसा असणार नवीन Bus Depo ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune New Bus Depo : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरात शिक्षणासाठी अन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.

दररोज हजारोंच्या संख्येने देशातील कानाकोपऱ्यातून नागरिक पुण्यात ये-जा करत असतात. एसटी महामंडळाची बस किंवा मग रेल्वेने नागरिक पुण्याचा प्रवास करतात.

दरम्यान पुण्यातून एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात आता नवीन बस डेपो तयार होणार आहे.

हा बस डेपो अतिशय उत्कृष्ट सोयी सुविधायुक्त राहणार असून यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोंडीतून बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे. खरे तर शिवाजीनगर येथे असलेले आधीचे बस स्थानक तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आले. महा मेट्रोने हे बस स्थानक Metro च्या कामासाठी पाडले होते.

तसेच शहरातील नागरिकांसाठी वाकडेवाडी येथे तात्पुरते बस स्थानक तयार करण्यात आले. मात्र हे तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेले बसस्थानक जरा शहराबाहेर असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

म्हणून शिवाजीनगर येथे मेट्रोच्या कामासाठी पाडण्यात आलेला बस डेपो लवकरात लवकर तयार व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे. दरम्यान, शिवाजीनगर येथे मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे.

तसेच आता नवीन बस स्थानकासाठी देखील हालचाली वाढल्या आहेत. शिवाजीनगर येथे आता नवीन बसेस स्थानक तयार होणार असून यासाठीचा खर्च महा मेट्रो करणार आहे. वास्तूविशारद शरद प्रभू यांच्या हस्ते या नवीन बस डेपो चे डिझाईन तयार केले जात आहे.

कसं असणार नवीन बस स्थानक ?

हे नवीन बस स्थानक कसं असणार, याच डिझाईन कसे असेल याबाबत जाणून घेण्याची मोठी उत्सुकता पुणेकरांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र या नवीन बस डेपोचे डिझाईन वास्तु विशारद शरद प्रभू यांचा हस्ते अजून तयार झालेले नाही.

पण लवकरच हे डिझाईन अंतिम केले जाईल आणि या डिझाईनचे सादरीकरण होणार आहे. डिझाईनचे सादरीकरण झाल्यानंतरच हे नवीन स्थानक कसे राहणार याबाबत काही कल्पना येऊ शकणार आहे.

पण या नवीन स्थानकावरून मेट्रो, रेल्वे आणि बसची सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना या स्थानकाचा मोठा फायदा होणार आहे. म्हणून यां नवीन स्थानकाचे बांधकाम केव्हा सुरु होते याकडे पुणेकरांचे विशेष लक्ष आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा