आनंदाची बातमी ! पुण्यात ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन बस स्थानक, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune New Bus Depo : पुण्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील लालपरीच्या प्रवाशांसाठी म्हणजेच एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आणि खास राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात लवकरच एक नवीन बस स्थानक तयार होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, शहरात मेट्रोची कामे सुरु आहेत. सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

तसेच काही मार्गांचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. पण शहरातील मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर येथे 3700 चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रावर उभे असलेले हे बस स्थानक पाडण्यात आले होते.

ज्यावेळी हे स्थानक पाडलं गेलं त्यावेळी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यात नवीन स्थानकाच्या उभारणीबाबत करार झाला होता. मात्र, यानंतर सरकारने यामध्ये हस्तक्षेप झाला आणि स्थानक व स्थानकावर व्यापारी संकुल बांधायचे असे ठरवण्यात आले.

मात्र हे काम पीपीपी तत्त्वावर करायचे की बीओटी तत्त्वावर करायचे यातच हा प्रकल्प अडकून होता. दरम्यान जुने स्थानक पाडून आता तीन वर्षे होत आली आहेत. महामेट्रोने या स्थानकाला पर्यायी स्थानकासाठी वाकडेवाडी येथील सरकारी दूध डेरी ची जागा दिली आहे.

या ठिकाणी तात्पुरत्या स्थानकाची उभारणी देखील करण्यात आली आहे. आता शिवाजीनगर बसस्थानकाच्या खाली भुयारी मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्यावर एसटीचे स्थानक बांधलेले नाही.

दरम्यान वाकडेवाडी येथे तात्पुरते उभारण्यात आलेले हे स्थानक प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे लवकरात लवकर शिवाजीनगर बस स्थानकाचे काम झाले पाहिजे असे शहरातील नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान आता शिवाजीनगर येथे नवीन बस स्थानक तयार होणार आहे. हे बसस्थानक महा मेट्रो आपल्या खर्चातून बांधून देणार आहे. या स्थानकाच्या डिझाईनचे काम वास्तुविशारद शरद प्रभू यांच्या हस्ते केले जात आहे.

तसेच या डिझाईनिंगचे सादरीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच नवीन स्थानकाची भेट मिळेल आणि त्यांचा एसटीचा प्रवास आणखी सुलभ होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

या स्थानकाची सर्वात मोठी विशेषता अशी असेल की येथून रेल्वे, मेट्रो आणि बस अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मेट्रो आणि बस प्रवाशांना येथूनच प्रवास करता येणे शक्य होणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा