पुणे ते नाशिक प्रवास होणार सुसाट ! तयार होणार नवीन द्रुतगती मार्ग, प्रवासाचे अंतर 50 किलोमीटरने होणार कमी, कसा असेल रूटमॅप ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Nashik Travel : पुणे, नासिक आणि मुंबई ही महाराष्ट्रातील तीन अतिशय महत्त्वाची शहरे आहेत. या तीन शहरांचा सुवर्ण त्रिकोण हा महाराष्ट्राच्या विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत राहिला आहे. या सुवर्ण त्रिकोणातील पुणे आणि मुंबई ही आधीपासूनच सधन आणि विकसित शहरे आहेत.

मात्र नासिक हे शहर तुलनेने कमी विकसित आहे. अलीकडे मात्र या शहराचा विस्तार देखील मोठ्या झपाट्याने झाला आहे. राज्यातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ म्हणून हे शहर उदयास आले आहे. दरम्यान नाशिक आणि पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वास्तविक पुणे ते नाशिक आणि नाशिक ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. रोजाना या दोन्ही शहरादरम्यान हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र सध्या स्थितीला पुणे ते नाशिक हा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास अनेकांना नकोसा झाला आहे.

पुणे ते नाशिक हे अंतर 220 km आहे, मात्र हे 220 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना जवळपास सहा तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन आणि मोठी तारेवरची कसरत करून हा प्रवास पूर्ण करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना हा प्रवास करण्यासाठी अधिक कालावधी लागत आहे.

त्यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ तर वाया जातोच शिवाय अपघातांची शक्यता देखील शक्यता नाकारता येत नाहीये. या प्रवासादरम्यान अनेकदा अपघातांच्या घटना घडल्या सुद्धा आहेत. मात्र आता पुणे ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार असून वाहतूक कोंडी मधून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे अपघातांची संख्या देखील कमी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ते पुणे हे प्रवासाचे अंतर आता 50 किलोमीटरने कमी होणार आहे. कारण की यादरम्यान आता नवीन द्रुतगती मार्ग तयार केला जाणार आहे. साहजिकच यामुळे प्रवासाच्या कालावधीत मोठी बचत होईल अशी शक्यता आहे. हा द्रुतगती मार्ग पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या तळवडे आणि चिखली लगतच्या म्हाळुंगे येथून सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.

हा नवीन मार्ग पुण्यातील उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील तळवडे-माळुंगे-आंबेठाण-कोरेगाव-किवळे-कडूस-चास-घोडे गाव-जुन्नर-अकोले-संगमनेर-सिन्नर नाशिक असा प्रस्तावित करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावित मार्गामुळे पिंपरी चिंचवड, खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर, नाशिक हे तालुके परस्परांना जोडले जाणार आहेत आणि या दोन्ही शहरादरम्यानचे अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे. म्हणजे पुणे ते नाशिक हे अंतर 220 किलोमीटर वरून थेट 180 किलोमीटर पर्यंत कमी होणार आहे.

हा द्रुतगती मार्ग राहणार असल्याने या मार्गावर वाहनांचा वेग देखील वाढणार आहे. यामुळे आता पुणे ते नाशिक हा प्रवास जलद होईल अशी शक्यता आहे. तसेच नाशिक फाटा ते चाकणपर्यंत असणारा महामार्ग सहापदरी केला जाणार आहे. म्हणजेच सध्याचा मार्ग देखील रुंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे साहजिकच नाशिक ते पुणे आणि पुणे ते नाशिक हा प्रवास गतिमान होणार आहे.

शिवाय नासिक ते पुणे दरम्यान सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा अद्याप नारळ फुटलेला नाही मात्र वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पात रस दाखवला असून हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे. यामुळे नासिक आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.