Pune Nashik Semi High Speed Railway : पुणे आणि नासिक ही पुणे, नाशिक, मुंबई या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ही दोन्ही महत्त्वाची शहरे राज्यातील सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते तर नासिक ग्रेप सिटी म्हणून आणि एक प्रमुख कृषी बाजारपेठ म्हणून संपूर्ण देशभरात ख्यातनाम आहे.
विशेष म्हणजे पुणे ते नाशिक आणि नाशिक ते पुणे हा दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूपच अधिक आहे. पण सध्या स्थितीला पुणे ते नाशिक थेट रेल्वेमार्ग नाही. परिणामी या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अधिक किचकट बनला आहे. या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतानाही अद्यापपर्यंत या दोन्ही शहरादरम्यान थेट रेल्वे मार्ग नसल्याने हे दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने थेट जोडली गेली पाहिजेत अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे.
दरम्यान नागरिकांच्या याच मागणीनुसार पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हाय स्पीड रेल्वे सुरू करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा प्रकल्प महारेलच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. यासाठीचे काम महारेलच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठीचा आराखडा देखील तयार करण्यात आला होता. तो आराखडा रेल्वे बोर्डाकडे देखील मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.
मात्र यामध्ये रेल्वे बोर्डाला काही त्रुटी आढळली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या आराखड्याचा प्रस्ताव हा मध्य रेल्वे कडे तपासणीसाठी आणि दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान मध्ये रेल्वे कडून आता या आराखड्यामध्ये दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेकडून या आराखड्यामध्ये आता दुरुस्ती केली जाईल आणि मग सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
खरतर, या प्रकल्पासाठी खोडद येथील जीएमआरटी भागात काही समस्या आढळून आली आहे. अद्याप ही समस्या दूर झालेली नसून मध्ये रेल्वेकडून ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच ही समस्या दूर होईल आणि या प्रकल्पाचा सुधारित आराखडा प्रस्ताव रेल्वे बोर्डामार्फत पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश ललवाणी यांनी सांगितले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये काही त्रुटी आढळल्या असल्याने रेल्वे बोर्डाने याचे काम मध्ये रेल्वेकडे दिले आहे. यामुळे आता मध्य रेल्वे या प्रकल्पातील त्रुटी दूर करून याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड मार्फत पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवणार आहे.
एकंदरीत या प्रकल्पातील आराखड्यात असलेली त्रुटी मध्य रेल्वे आता दूर करेल आणि याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी जाईल आणि मग PMO ची मंजुरी मिळाल्यानंतर तेथून पुढे खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे काम सुरू होईल असे चित्र तयार होत आहे.