पुणे-नासिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात ! दिलेत ‘हे’ महत्त्वाचे निर्देश, प्रकल्पाला मिळणार गती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Nashik Railway Project : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातीप्राप्त असलेले पुणे आणि वाईन सिटी म्हणून संपूर्ण जगात आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित करणारे नासिक ही दोन्ही शहरे पुणे-नासिक-मुंबई या सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचा भाग आहेत. मात्र असे असले तरी या दोन्ही शहरादरम्यान सध्या स्थितीला प्रवास करण्यासाठी थेट रेल्वे मार्ग उपलब्ध नाही.

यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास सध्या रस्ते मार्गाने करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे. अशा स्थितीत ही दोन्ही शहरे परस्परांना लोह मार्गाने अर्थातच रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. यानुसार पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या म्हणीप्रमाणे या प्रकल्पासाठी अगदी सुरुवातीपासूनच मोठ्या अडचणी येत आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु आता हा प्रकल्प वेगात पूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकल्पात जातीने लक्ष घातले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला हा प्रकल्प आता जलद गतीने पूर्ण होईल आणि या दोन्ही शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता राज्य शासनाची महारेल ही कंपनी पुढाकार घेणार आहे. खरंतर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी आढावा घेतला होता. या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी महारेलने जर हा प्रकल्प हाती घेतला तर भूसंपादनाची अडचण येणार नाही असे सांगितले होते. मेट्रो प्रकल्पांसाठी ज्याप्रमाणे भूसंपादन झाले त्याच धर्तीवर या प्रकल्पासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.

यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची परवानगी न घेता केंद्रीय नगर विकास विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे महारेलने जर या प्रकल्पाचे काम केले तर प्रकल्प जलद गतीने पूर्ण होणार असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी महारेलला या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान उपमुख्यमंत्री महोदय यांनी आदेश दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महारेलला या प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे आता हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण होऊ शकतो असे मत जाणकार लोकांकडून व्यक्त होत आहे. खरंतर या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती.

या भेटीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली होती. मात्र एकट्या रेल्वेमंत्र्यांची मान्यता मिळून चालणार नव्हते यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक होती. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला अद्याप मान्यता दिलेली नाही. यामुळे हा प्रकल्प आतापर्यंत रखडला आहे. दरम्यानच्या काळात पुणे जिल्ह्यात या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झाले होते.

मात्र खेड तालुक्यात ज्या ठिकाणी या प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या जात आहेत त्या ठिकाणी संरक्षण विभागाचा एक संवेदनशील प्रकल्प आहे. यामुळे संरक्षण विभागाने या प्रकल्पाबाबत आक्षेप घेतला आहे. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असल्याने लवकरच या प्रकल्पाचे काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त होत आहे.