Pune Nagpur Railway : राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर, पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
दिवाळीच्या काळात तर या रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होत असते. या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
फक्त दिवाळीच्या काळातच रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी असते असे नाही तर दिवाळीमध्ये गावाकडे गेलेले लोक दिवाळीनंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतत असतात अशा परिस्थितीत दिवाळीनंतर देखील या मार्गावर असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये देखील कायमच गर्दी पाहायला मिळते.
या सर्व पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून या मार्गांवर दिवाळीच्या काळात विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात असतात.
तसेच आता मध्य रेल्वेच्या माध्यमातून दिवाळीनंतर देखील या मार्गावर विशेष गाडी चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून संत्रा नगरी नागपूर येथून मुंबईसाठी विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण नागपूर येथून चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत तसेच ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याबाबत जाणून घेणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अर्थातच 19 नोव्हेंबर 2023 रोजी नागपूर पुणे विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे.
ही गाडी उद्या रविवारी रात्री साडेनऊ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे रवाना होणार आहे. तसेच ही गाडी सोमवारी अर्थातच 20 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे.
ही गाडी रात्री साडेनऊ वाजता नागपूर येथून निघेल आणि पुढे अजनीला रात्री ९.३९ वाजता, वर्धा येथे १०.४४ वाजता, पुलगाव येथे ११.०९ वाजता आणि पुण्याला बारा वाजून दहा मिनिटांनी पोहचणार आहे.
ही गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे. अजनी, वर्धा, पुलगाव यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा दिला जाणार आहे.