‘या’ प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई प्रवास होणार होता फक्त 20 मिनिटात, पण काम पूर्ण होण्यापूर्वीच घडलं विपरीत; आता प्रकल्पाचा गाशा गुंडाळणार का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mumbai Travel : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे मार्गावर आणि रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांना प्रवासासाठी मोठी अडचण सहन करावी लागत आहे. पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील वाहतूक कोंडीचा जबर फटका बसत आहे.

रस्ते मार्गाप्रमाणेच रेल्वे मार्गावर देखील वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. हा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त असून या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या नेहमीच हाउसफुल असतात. दरम्यान या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास अवघ्या वीस मिनिटात पूर्ण व्हावा यासाठी हायपरलूप प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाची घोषणा वर्तमान उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी पीएमआरडीए अर्थातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुढाकार घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र हा प्रकल्प फक्त युती सरकारच्या काळात चर्चेत राहिला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हा प्रकल्प मागेच पडला. दरम्यान आता या प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची उभारणी करणारी एकमेव अमेरिकन कंपनी अवघ्या नऊ वर्षाच्या काळातच बंद पडली आहे.

कंपनीने गाशा गुंडाळला असल्याने आता हा प्रकल्प देखील गाशा गुंडाळणार असे वाटत आहे. पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पाची घोषणा 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास फक्त वीस मिनिटात पूर्ण होणार होता. हा प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता.

यामुळे या प्रकल्पासाठी फडणवीस यांनी मोठा पुढाकार घेतला होता. हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केलेत यात शंकाच नाही. मात्र महायुतीचे सरकार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प फाईल बंदच राहिला. फाईलवर धूळ चढली मात्र महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाकडे ढुंकून पाहिले नाही.

दरम्यान राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापित झाले. यामुळे हा प्रकल्प आता लवकरच सुरू होणार अशा चर्चा पुन्हा रंगू लागल्यात. मात्र याबाबत शासनाकडून काही हालचाली होतील अशातच हा प्रकल्प पूर्ण करणारी अमेरिकन कंपनी बंद पडली.

कसा होता प्रकल्प

पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्प अंतर्गत कुर्ला बीकेसी ते वाकड यादरम्यान 117 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार होता. या हायपरलूप तंत्रज्ञानाच्या मार्गावर 496 किलोमीटर प्रतितास या वेगाने हायपरलूप धावणार होती. म्हणजेच याचा वेग हा बुलेट ट्रेन पेक्षा जास्त राहणार होता.

यामुळे या मार्गावरील प्रवास हा गतिमान होणार होता. पुणे ते मुंबई हा प्रवास फक्त वीस मिनिटात यामुळे पूर्ण करणे शक्य होणार होते. मात्र हा प्रकल्प या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी जरी उपयुक्त ठरणारा असला तरी देखील या प्रकल्पावर नीती आयोगाने आक्षेप नोंदवला होता.

आर्थिक दृष्ट्या हा प्रकल्प आता राज्यात राबवणे व्यवहार्य नसल्याचे निती आयोगाने स्पष्ट केले होते. दरम्यान, हायपरलूप बनवणारी एकमेव अमेरिकन कंपनी आता बंद पडली असल्याने हा प्रकल्प पुन्हा सुरू होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा