Pune Mumbai Railway : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी विकेंडला पुणे ते मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष महत्त्वाची राहणार आहे.
खरंतर वीकेंडला पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच वाढत असते. अनेक लोक वीकेंडला या मार्गावर प्रवास करत असतात. या मार्गावर रस्ते मार्गाने तसेच रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक असते.
परंतु विकेंडच्या काळात या मार्गावरील प्रवाशांची संख्या थोडी वाढते. दरम्यान या विकेंडला पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
कारण की, पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या या वीकेंडला धावणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे जर या विकेंडला पुणे ते मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुम्हाला ही बातमी शेवटपर्यंत वाचावी लागणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक दरम्यान शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच काम केल जाणार आहे. यामुळे हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.
या ब्लॉकमुळे मात्र या मार्गावर धावणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. आता आपण रेल्वे कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द करणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
या एक्सप्रेस गाड्या होणार रद्द
या ब्लॉकमुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्यात अशी माहिती रेल्वेच्या माध्यमातून समोर येत आहे.
याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या देखील उशिराने धावणार असून, काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
यामुळे जर तुम्ही या मार्गावर विकेंडला प्रवास करत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.