पुणे, मुंबई, नागपूर मेट्रोत नोकरीचा गोल्डन चान्स ! महामेट्रो अंतर्गत ‘या’ पदाच्या रिक्त जागांसाठी निघाली मेगाभरती, 10वी पास उमेदवारांना संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mumbai Nagpur Metro Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मेट्रोत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अधिक खास राहणार आहे.

कारण की महा मेट्रोमध्ये काही रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत दहावी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच महा मेट्रो येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे.

तसेच या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. जर तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल आणि महा मेट्रोने जारी केलेल्या निकषात बसत असाल तर तुम्हाला या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण या भरतीची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती?

महा मेट्रोकडून जारी करण्यात आलेल्या या नवीन पदभरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या अंतर्गत एकूण 134 रिक्त जागा भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी किमान दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि शैक्षणिक पात्रतेबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचणे अपेक्षित आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी किमान 17 ते कमाल 24 या वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

नोकरी करण्याचे ठिकाण

या पदभरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पुणे नागपूर आणि नवी मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज शुल्क किती राहणार 

या भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून शंभर रुपये भरावे लागणार आहेत.

अर्ज कसा करावा लागेल

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज कालपासून अर्थातच 28 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करायचा आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज सादर करता येणार नाही.

जाहिरात कुठे पाहणार

https://drive.google.com/file/d/1RxfnXH7NA8BmoAlOq0MtpgsE5TYCpQLh/view या लिंकवर या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा