Pune Mhada News : गेल्या काही दशकात घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोक घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात.
अशातच पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे म्हाडा पुणे मंडळांने 5863 घरांसाठी जाहिरात काढली आहे. आज 5 सप्टेंबर 2023 रोजी म्हाडाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
यामुळे केल्या अनेक दिवसांपासून पुणे मंडळाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की मार्च 2023 मध्ये पुणे मंडळाने 6000 घरांसाठी लॉटरी काढली होती.
त्यावेळी अनेकांचे घर आमचे स्वप्न पूर्ण झाले होते. तेव्हापासून पुणे मंडळाची पुढील लॉटरी केव्हा निघणार? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. अनेक नागरिक पुणे मंडळाच्या या सोडतीची वाट पाहत होते.
दरम्यान आता पुणे मंडळांने 5863 घरांसाठीची सोडत जाहीर केली असून याचे वेळापत्रक देखील समोर आले आहे. अशा स्थितीत आज आपण हे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे मंडळाच्या 5863 घरांसाठीचे वेळापत्रक
म्हाडाच्या 5863 घरांसाठी ची जाहिरात : 5 सप्टेंबर 2023 रोजी याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्ज विक्री आणि स्वीकृती ला केव्हा सुरुवात होणार : यासाठीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीला आजपासून सुरुवात झाली आहे. 5 सप्टेंबर 2023 ला दुपारी 12 वाजेपासून या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक : या सोडतीसाठी 29 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहेत. अनामत रकमेसह 29 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करायचा आहे.
सोडतीची अंतिम यादी केव्हा निघणार : या सोडतीसाठी सादर होणाऱ्या अर्जापैकी पात्र अर्जांची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे.
लॉटरी केव्हा निघणार : 5863 घरांसाठीची संगणकीय सोडत म्हणजेच लॉटरी 18 ऑक्टोबर 2023 रोजी काढली जाणार आहे.