पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! मेट्रोने प्रवासासाठी Pune Metro ने तयार केला ‘हा’ नवीन नियम, नियमांचे उल्लंघन झाल्यास मोठा दंड लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार पाहता आता शहरात वाहतूक कोंडीची समस्या एक कॉमन गोष्ट बनली आहे. यामुळे शहरातील नागरिकांसाठी मेट्रो सुरु करण्यात आली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये शहरातील दोन मेट्रो मार्ग नागरिकांसाठी सुरू झाले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मेट्रो मार्गांवर मेट्रो सुरु झाली आहे. खरे तर हे दोन्ही मार्ग 2021 मध्ये सुरू होणार होते. पण विविध तांत्रिक कारणांमुळे हे मार्ग 2023 मध्ये सुरू झाले आहेत.

दरम्यान, या दोन्ही मेट्रोमार्गांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शहरातील नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत गतिमान आणि आरामदायी झाला आहे.

यामुळे मेट्रोला पुणेकरांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. अशातच मात्र पुणे मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे.

जर तुम्ही ही पुणे मेट्रो ने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो ने प्रवास करण्यासाठी एक नवीन नियम तयार केला आहे.

या नियमानुसार आता मेट्रो प्रवासासाठी तिकीट काढल्यानंतर गंतव्य स्थानकातून बाहेर पडण्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 90 मिनिटाच्या कालावधीत पूर्ण करायचा आहे.

म्हणजेच मेट्रो प्रवासासाठी तिकीट काढले की 90 मिनिटांच्या कालावधीत प्रवाशांना आपला संपूर्ण प्रवास पूर्ण करायचा आहे. जे प्रवासी या निर्धारित कालावधीमध्ये आपला प्रवास पूर्ण करणार नाहीत त्यांना दंड द्यावा लागणार आहे.

जें प्रवासी या निर्धारित वेळेत आपला प्रवास पूर्ण करणार नाहीत त्यांच्याकडून प्रत्येक तासाला दहा रुपये ते 50 रुपये एवढा दंड आकारला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

यामुळे जर तुम्ही ही पुणे मेट्रो ने प्रवास करत असाल तर तुम्हालाही या नियमाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. जर या नियमाचे पालन झाले नाही तर तुम्हाला मोठा दंड द्यावा लागू शकतो.

दरम्यान मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा नागरिकांनी चांगलाचं समाचार घेतला आहे. नागरिकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा