Pune Metro News : गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे व पिंपरी चिंचवडकरांना एक मोठं गिफ्ट दिलं. ते म्हणजे गेल्या महिन्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यात आले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक या विस्तारित मार्गांवर मेट्रो सुरु करण्यात आली आहे.
खरंतर पुणे मेट्रोची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. तसेच 2022 मध्ये अंशता खुले करण्यात आलेले दोन मेट्रो मार्ग देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सुरू केले होते.
तसेच गेल्या महिन्यात अर्थातच एक ऑगस्ट 2023 रोजी सिविल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच उद्घाटन करण्यात आले आहे.
दरम्यान या मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांनी या दोन्ही मार्गांना अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. या मार्गांवर रोजाना 65,000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. यामुळे पुणेकरांचा प्रवास सुपरफास्ट झाला असून त्यांच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
तो म्हणजे आता मेट्रोचा विस्तार थेट लोणी काळभोर पर्यंत होणार आहे. शिवाजीनगर ते लोणी काळभोर दरम्यान मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. अशातच आता या प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रोमार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी आर्थिक तांत्रिक सल्लागार समिती नेमण्याची सूचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून अर्थातच पीएमआरडीए कडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यामुळे पुणे मेट्रोचे पाऊल पडते पुढे असे बोलले जात आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. याच मार्गाचा आता पुढे विस्तार केला जाणार असून शिवाजीनगर ते लोणी काळभोर पर्यंत हा मार्ग वाढवला जाणार आहे.
म्हणजेच शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. निश्चितच हा प्रस्तावित करण्यात आलेला मेट्रोमार्ग झाल्यानंतर शहरातील नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. यामुळे या भागातील विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल असे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे.