Pune Metro News : गेल्या काही वर्षांपासून शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीने अधिक प्रवास करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विविध मार्गावर मेट्रोची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे काही मार्गांवर मेट्रो सुरू देखील झाली आहे.
यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक या विस्तारित मार्गांवर नुकतीच मेट्रो सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विस्तारित मेट्रोमार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात हे विस्तारित मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले असून प्रवाशांनी या मेट्रो मार्गांना भलताच चांगला प्रतिसाद दाखवला आहे. दिवसाकाठी या मेट्रो मार्गांनी 65000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या विस्तारित मेट्रो मार्गांचा आणखी विस्तार केला जात आहे.
त्यानुसार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी आणि सिविल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गांचे सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग येत्या काही महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दरम्यान सिविल कोर्ट के स्वारगेट यादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या तीन भुयारी स्थानकांची कामे सध्या एकाच वेळी सुरू आहेत.
या तिन्ही स्थानकांची कामे एकाच वेळी पूर्ण व्हावीत या दृष्टीने या तिन्ही स्थानकांचे काम एकाच वेळी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम जवळपास 85 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे यासाठी मेट्रो कडून प्रयत्न केले जात आहेत.
मंडई व बुधवार पेठ या स्थानकाअगोदर स्वारगेट या स्थानकाचे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास मेट्रोने व्यक्त केला आहे. त्यामुळे स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान लवकरच मेट्रोने प्रवास करता येणार असल्याचे सांगितले जात आहे.