पुणेकरांसाठी खुशखबर…! मेट्रोबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय, प्रवाशांच्या मागणीला अन अजित दादांच्या सूचनेला यश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. अशातच एक ऑगस्ट रोजी पुणेकरांना दोन नवीन मेट्रो मार्गाची भेट मिळाली आहे.

सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या दरम्यान आता मेट्रो धावू लागली आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान झाला असून या नव्याने सेवेत दाखल झालेल्या मेट्रो मार्गांना प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. मेट्रो प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

एकीकडे मेट्रोने शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित झाला आहे तर दुसरीकडे मेट्रो प्रवासादरम्यान नागरिकांना काही अडचणी देखील सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मेट्रो प्रवाशांनी अडचणींचा पाढा वाचला होता.

मेट्रो प्रवाशांनी उपमुख्यमंत्री महोदय यांना मेट्रो प्रवासादरम्यान त्यांना कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे याविषयी अवगत केले होते. यावेळी मेट्रो प्रवाशांच्या माध्यमातून मेट्रोच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती.

मेट्रो सुरु झाल्यानंतर सकाळी सात वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मेट्रो चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रवाशांनी सकाळी सहा वाजेपासून मेट्रो सुरु करावी आणि रात्री तर अकरा वाजेपर्यंत मेट्रो चालवावी अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती.

पवार यांनी देखील प्रवाशांची ही मागणी गांभीर्याने घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत मेट्रोच्या अधिकाऱ्यांना मेट्रोच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच सूचनेचे पालन करत आता मेट्रोच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नवीन निर्णयानुसार आता शहरातील मेट्रो सकाळी सात ऐवजी सहा वाजता सुरु होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही मेट्रो आता रात्री १० ऐवजी रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुणेकर शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कन क्विनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील मेट्रोच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. आता शहरातील नागरिकांना मेट्रोने प्रवास करून सिंहगड, प्रगती तसेच डेक्कन क्वीन एक्सप्रेसने पुढचा प्रवास करता येणार आहे. यामुळे मेट्रोच्या या निर्णयाचे नागरिकांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा