Pune Metro News : पुणेकरांसाठी मेट्रो संदर्भात एक आशादायी वृत्त समोर आले आहे. ते म्हणजे शहरातील एका महत्त्वाच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. सध्या पुणे मेट्रोचे काम आघाडीवर सुरू असून शहरातील महत्त्वाच्या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांना गती दिली जात आहे.
पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा या पार्श्वभूमीवर सध्या स्वारगेट या भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लीनिक या दोन विस्तारित मेट्रो मार्गांना सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आले आहे.
हे मार्ग मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर पुणेकरांचा प्रवास गतिमान झाला आहे. या मेट्रो मार्गांना पुणेकरांनी चांगला प्रतिसाद देखील दाखवला आहे. रोजाना या दोन्ही मेट्रो मार्गांवरून 65000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे आता या विस्तारित मेट्रो मार्गांचा आणखी विस्तार केला जाणार आहे.
यानुसार सध्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी आणि सिविल कोर्ट स्थानक ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. यापैकी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने सुरू असून आगामी काही महिन्यात हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू केला जाणार आहे. सिविल कोर्ट स्थानक ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे बहुतांशी काम अद्याप बाकी आहे.
मात्र हे देखील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मेट्रो प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या स्वारगेट या भूमिगत मेट्रोस्थानाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच हे मेट्रो स्थानक मुंबई व बुधवार पेठ येथील मेट्रो स्थानकापेक्षा आधी सुरू होणार असा विश्वास मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे आता स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान लवकरच मेट्रो धावणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान स्वारगेट या भूमिगत मेट्रोस्थानाकाचे 85% एवढे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मेट्रोचा राहणार आहे. यामुळे हे स्थानक लवकरच पूर्ण होईल आणि स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रोने प्रवास शक्य होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.