Pune Metro News : पुणे हे महाराष्ट्रातील एक अति महत्त्वाचे शहर आहे. या शहराला सांस्कृतिक राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे या शहराला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शिवप्रभूंच्या काळापासून हे शहर महाराष्ट्राच्या अजरामर संस्कृतीचे दर्शन घडवत आहे. हेच कारण आहे की या शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
दरम्यान महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बखान करणारे हे शहर अलीकडे आयटी हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे शहर आता महाराष्ट्राच्या संस्कृतीसोबतच महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे देखील दर्शन घडवू लागले आहे. या शहरात भल्याभल्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहरातील लोकसंख्येत गेल्या काही दशकात विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे मात्र शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी सिद्ध होत आहे.
अशा स्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरु आहे. गेल्या महिन्यात एक ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट या मार्गावरील विस्तारित मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवला आहे.
खरंतर 2022 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला होता. परंतु पहिल्या टप्प्यातील मेट्रोला पुणेकरांनी फारशी पसंती दाखवली नाही. पण जेव्हापासून विस्तारित मार्गांवर मेट्रो धावत आहे तेव्हापासून मेट्रो ने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वधारू लागली आहे. यामुळे मेट्रो प्रशासन आणि शासन गदगद पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे मेट्रोला मिळणारी पसंती पाहता आता आणखी एका मार्गावर मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची घोषणा केली आहे. पवार यांनी निगडी ते कात्रज दरम्यान मेट्रो सुरू करणार अशी घोषणा केली आहे. या मेट्रो मार्गाला नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान हा नव्याने घोषित झालेला मेट्रो मार्ग शहरातील चौथा मेट्रो मार्ग राहणार आहे. हा चौथा मेट्रो मार्ग काही ठिकाणी भूमिगत आणि काही ठिकाणी उन्नत राहणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सध्या पिंपरी ते स्वारगेट दरम्यान मेट्रो मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून निगडी ते कात्रज दरम्यान देखील मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडसह आकुर्डी मधील नागरिकांचा प्रवास गतिमान होणार अस बोललं जात आहे.