पुणे मेट्रोबाबत समोर आली मोठी माहिती; ‘या’ दोन मार्गावरील मेट्रोने रचला ‘हा’ मोठा विक्रम, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : राजधानी मुंबई शहरापाठोपाठ पुणे शहरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. खरंतर पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहराच्या लोकसंख्येसाठी अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी पुणे शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे वेगाने विकसित केले जात आहे.

डिसेंबर 2022 पूर्वी पुणेकरांना प्रवासासाठी पीएमपीएलच्या बसचाच पर्याय उपलब्ध होता. पण डिसेंबर 2022 मध्ये पुणे शहरात सर्वप्रथम मेट्रो धावली. सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील या मेट्रोला प्रवाशांनी प्रतिसाद दाखवला नाही. पण गेल्या ऑगस्ट महिन्यात पुणेकरांच्या सेवेत विस्तारित मेट्रो मार्गांवरील सेवा सुरू करण्यात आली.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या दोन महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवला आहे. तेव्हापासून पुणेकरांचा प्रवास जलद झाला असून यामुळे पुणे मेट्रोला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

दरम्यान पुणे मेट्रोबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने एक नवीन विक्रम रचत मेट्रोच्या तिजोरीत तब्बल एक कोटी 41 लाख रुपयांचा मोठा महसूल जमा केला आहे. खरंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो ने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशानिर्देशानुसार मेट्रोच्या वेळापत्रकात बदल केला. गणेशोत्सवाच्या काळात सकाळी सहा पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पुणे मेट्रो चालवली गेली. विशेष म्हणजे विसर्जनाच्या दिवशी अर्थातच 28 सप्टेंबर रोजी पुणे मेट्रो पहाटे दोन वाजेपर्यंत चालवली गेली.

याचा परिणाम म्हणून पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. याचा पुणेकरांना मोठा फायदा देखील झाला. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात नऊ लाख 61 हजार लोकांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान या दोन्ही मेट्रो मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवामध्ये दर दिवशी एक लाख 63 हजाराहून अधिक पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला.