Pune Metro News : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून मेट्रो मार्गाचे जाळे तयार केले जात आहे. सध्या स्थितीला शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. हे दोन्ही मार्ग महा मेट्रो कडून विकसित झाले आहेत. विशेष म्हणजे यातील सिविल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
अशातच मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीए कडून विकसित होत असलेल्या मेट्रो मार्गासंदर्भात देखील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जातोय. हा मेट्रो मार्ग पीपीपी अर्थातच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर पूर्ण केला जात आहे.
या मेट्रो मार्गामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांना ही हिंजवडीपर्यंत मेट्रो ने प्रवास करता येणार आहे. आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी यामुळे शहरातील मध्यवर्ती भागाशी कनेक्ट होणार आहे.
दरम्यान आता आपण याच मेट्रोमार्गासंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच हा मेट्रो मार्ग केव्हापर्यंत सुरू होऊ शकतो ? याबाबत पी एम आर डी ए च नियोजन काय आहे याविषयी देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे मेट्रो मार्ग ?
हिजवडी ते शिवाजीनगर दरम्यान 23.3 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होत आहे. पीएमआरडीए या मेट्रो मार्गाची उभारणी करत असून हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर टाटा समूहासोबत विकसित होत आहे.
या मार्गासाठी जवळपास आठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 23 स्थानके तयार केली जाणार आहेत. या प्रकल्पाचे सध्या स्थितीत 47 टक्के काम पूर्ण झालेले आहे.
विशेष म्हणजे उर्वरित काम देखील जलद गतीने पूर्ण व्हावेत यासाठी पीएमआरडीए प्रयत्न करत आहे. यामुळे हा संपूर्ण मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होईल आणि पुणेकरांना पुणेरी मेट्रोचा लाभ घेता येईल अशी आशा आहे.
या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, गणेशखिंड, खैरेवाडी आदी भाग शिवाजीनगरला जोडला जाणार आहे. यामुळे या सदर भागातील नागरिकांना शहरातील मध्यवर्ती भागासोबत मेट्रोचा कनेक्ट मिळणार आहे.
सध्या स्थितीला या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मार्च 2025 पर्यंत हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती पीएमआरडीएकडून समोर आली आहे.