मोठी बातमी ! येत्या साडेतीन वर्षात पुण्यातील ‘या’ महत्त्वाच्या भागाला मेट्रोची भेट मिळणार ; कसा राहणार रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. या शहरात मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे तर विविध शैक्षणिक संस्थान देखील येथे स्थापित झालेले आहेत.

जगातील नामांकित शैक्षणिक संस्थानांमध्ये समाविष्ट असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुद्धा गणेशखिंड येथे म्हणजे पुण्यातच आहे. यामुळे शहरात शिक्षणासाठी तसेच रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

येथे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी आलेले नागरिक कायमस्वरूपी येथेच स्थायिक होत आहेत. ते देखील पुणेकर झाले आहेत. यामुळे पुण्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

याचा परिणाम म्हणून सध्या स्थितीला असलेल्या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. हेच कारण आहे की, आता शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात आतापर्यंत शहरातील दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गाचा पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा भाग सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.

तसेच वनाज ते रामवाडी या मार्गाचा वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हा भाग सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या मार्गांचे उर्वरित टप्पे देखील जलद गतीने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. येत्या नवीन वर्षात या दोन्ही प्रकल्पांचे राहिलेले मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

अशातच आता पुणेकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गाचा आता पुढे विस्तार होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी पर्यंत मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे.

यासाठी नुकतीच निवेदा देखील प्रसिद्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाला ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्राची मान्यता मिळाली. या मार्गाची एकूण लांबी 4.519 किलोमीटर एवढी आहे.

यासाठी जवळपास 910 कोटी रुपये खर्च होणार असा अंदाज आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी तीन वर्षे आणि तीन महिने एवढा कालावधी लागणारा आहे.

अर्थातच येत्या साडेतीन वर्षात या मार्गाचे काम पूर्ण होणार असे सांगितले जात आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक ही चार स्थानके तयार केले जाणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा