पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मेट्रो मार्गासाठी तातडीने निधी उपलब्ध होणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी होत आहे.

वाहतूककोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या सोयीसाठी शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. आतापर्यंत शहरात दोन मेट्रो मार्ग तयार झाले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट हा मार्ग सुरू झाला आहे. तसेच वनाज ते रामवाडी या मार्गांपैकी वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हा मार्ग सुरु झाला आहे.

विशेष म्हणजे, सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गांचे देखील युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

हे मार्ग येत्या नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी सुरू होतील अशी माहिती प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. याशिवाय, स्वारगेट ते कात्रज दरम्यानही मेट्रोमार्ग तयार केला जाणार आहे. अर्थातच आता कात्रज पर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे.

दरम्यान याच मेट्रोमार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती दिली आहे.

पवार यांनी सांगितल्याप्रमाणे या मेट्रो मार्गाला केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर लगेचच या मेट्रो मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

दरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे, या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. आता तिथे या प्रस्तावाला मान्यता मिळेल आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

ग केंद्रीय मंत्रिमंडळाकडून याला मान्यता मिळाल्यानंतर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होईल. एकंदरीत आगामी काही महिन्यात या मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरु होणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा