पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ मेट्रोस्थानकाबाबत होणार मोठा निर्णय, महामेट्रोचा पाठपुरावा सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे वेगाने तयार केले जात आहे. सध्या विविध मेट्रो मार्गांची कामे युद्ध पातळीवर सुरू असून काही मेट्रो मार्गांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तर काही मेट्रो मार्गांचे काम पूर्ण झाले असून या मेट्रो मार्गांची सेवा प्रवाशांसाठी खुली देखील करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट दरम्यानच्या दोन मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर पुणेकरांनी या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या मार्गावरील मेट्रो प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मात्र पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट दरम्यानच्या भोसरी मेट्रो स्थानकाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या मार्गावरील भोसरी मेट्रोस्थानाकाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वतः महामेट्रोनेच ही मागणी केली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने अर्थातच महामेट्रोने केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे ही मागणी केली आहे.

नाव बदलण्याची मागणी करण्याचे कारण ?

खरंतर भोसरी मेट्रोस्थानक ज्या ठिकाणी स्थित आहे त्या ठिकाणाला नाशिक फाटा म्हणून ओळखले जाते. मात्र मेट्रोस्थानाकाला नाव भोसरी देण्यात आले आहे. भोसरी हे ठिकाण या स्थानकापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

अशा परिस्थितीत भोसरी हे नाव बदलून त्या स्थानकाला नाशिक फाटा हे नाव मिळावे अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. यामुळे आता महा मेट्रोने प्रवाशांची हीच मागणी लक्षात घेता याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे.

विशेष म्हणजे महा मेट्रोने भोसरी स्थानकासोबतच बुधवार पेठ या स्थानकाचे देखील नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता महा मेट्रोच्या मागणीला यश मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान हा निर्णय झाला तर येथील मेट्रो प्रवाशांचा संभ्रम बऱ्यापैकी कमी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.