पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण, केव्हा सुरु होणार मार्ग? पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सामाजिक प्रयत्न केले जात आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे गेल्या अनेक शतकांपासून दर्शन घडवत आहे. हेच कारण आहे की या शहराला सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. अलीकडे मात्र हे शहर वाहतूक कोंडीसाठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे.

शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शहरातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रोचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गावर गेल्या महिन्यातच मेट्रो सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्तार देखील केला जात आहे. याशिवाय पुणे शहरात तिसऱ्या मेट्रो मार्गाचे देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच या तिसऱ्या मेट्रोमार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वारगेट ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहे. पुणे मेट्रोने स्वारगेट मेट्रो स्टेशनवर हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर बांधकाम सुरू केले आहे. सध्या या मेट्रो स्थानकाचे काम 85% पूर्ण झाले आहे.

मेट्रोचे अधिकारी स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक लवकरच पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करत आहेत. पुणे मेट्रोचे जनसंपर्क आणि प्रशासनाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, स्वारगेट रेल्वे स्थानकासोबत मंडई आणि बुधवार पेठ मेट्रो स्थानकांचे कामही वेगाने सुरू आहे. पण सध्याच्या प्रगतीच्या आधारावर पाहिलं तर स्वारगेट स्थानकच पहिले पूर्ण होईल असे दिसत आहे. खरतर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले असून, पुढील दोन टप्प्यांचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लवकरच प्रवाशांसाठी वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा रुबी हॉल स्टेशन ते रामवाडी हा राहिलेला भाग सुरु केला जाणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा मेट्रो मार्ग सुरू झाला असून सिविल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावरील तीन ट्यूब स्टेशनचे काम अद्याप अपूर्ण आहे. पण या देखील स्थानकांचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.

हे काम लवकर आणि एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी मेट्रो एकाच वेळी तिन्ही स्थानकांवर काम करत आहे. स्वारगेटला शहरातील महत्त्वाचे स्थान आहे आणि त्याला “पुण्याचे हृदय” म्हणून संबोधले जाते. येथे लोक आणि वाहनांची दैनंदिन आवक दिसून येते आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रमुख स्थानक देखील आहे. त्यामुळे, मेट्रो प्रशासन येथे एक मोठे व्यावसायिक स्टेशन बांधण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्याला मल्टीमॉडल मेट्रो हब म्हटले जात आहे.

हे स्थानक भूमिगत आहे, इमारतीचे वरचे मजले व्यावसायिक कारणांसाठी नियुक्त केले जाणार आहेत. हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या जवळ आहे. त्यामुळे लवकरच पुणे शहरातील मेट्रो प्रवाशांना शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान प्रवास करता येणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.