पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ऐन दिवाळीच्या काळात मेट्रोच्या वेळापत्रकात झाला महत्त्वाचा बदल, नवीन Timetable पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro New Timetable : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या पुणे मेट्रोसंदर्भात. ऐन दिवाळीच्या काळातच पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

सध्या दिवाळीच्या सणानिमित्त खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत आहे. बसेस, मेट्रो, रेल्वे सर्वत्र नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पण या गर्दीच्या कालावधीतच पुणे मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मेट्रोने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अर्थातच 12 नोव्हेंबर 2023 ला मेट्रोच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर सध्या स्थितीला महा मेट्रोच्या माध्यमातून मेट्रोचे संचालन केले जात आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गांवर दिवसाला जवळपास 60 ते 65 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता देखील आहे.

एकंदरीत जेव्हापासून शहरात मेट्रो सुरु झाली आहे तेव्हापासून शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलत आणि सुरक्षित झाला आहे. विशेष म्हणजे पुणेकरांनी मेट्रोला भरभरून असं प्रेम दिल आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये मेट्रोचे हे दोन मार्ग सुरू झाले आहेत आणि तेव्हापासून या दोन्ही मेट्रोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे. दरम्यान दिवाळीच्या काळात पुणे मेट्रोमध्ये प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मात्र असे असतानाही पुणे मेट्रो व्यवस्थापनाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थातच 12 नोव्हेंबरला सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रवाशांनी या बदललेल्या वेळापत्रकानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.

12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असल्याने मेट्रो व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पुणे मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत धावते. परंतु लक्ष्मीपूजन निमित्त पुणे मेट्रो 12 तारखेला सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच धावणार आहे.

म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चार तासांसाठी मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. तथापि सोमवारपासून पुन्हा एकदा मेट्रोचे नेहमीचे वेळापत्रक लागू राहणार आहे. सोमवारपासून पुणे मेट्रो पुन्हा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत धावणार आहे.