पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग 3 चे काम केव्हा पूर्ण होणार? किती काम झाले? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro Line 3 : पुण्यातील हिंजवडी हे आयटी हब म्हणून ओळखले जाते. इथे जगातील नामांकित आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पुणे शहराला आयटी हबचा दर्जा मिळाला आहे. दरम्यान या आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी कनेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मेट्रो मार्ग तीनचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. खरंतर गेल्या महिन्यात पुणे शहराला दोन मेट्रो मार्गांची भेट मिळाली आहे.

पिंपरी चिंचवड ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक यादरम्यान मेट्रो सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मेट्रोंना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देखील दाखवला आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्तार देखील केला जात आहे. सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गांचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. हे मार्ग येत्या काही महिन्यात शहरातील नागरिकांसाठी सुरू केले जाणार आहेत. तसेच शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या मार्गाच्या कामाला मोठी गती देण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या 14 महिन्यांच्या काळात या मार्गाचे 45 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे उर्वरित काम येत्या 18 महिन्यात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. म्हणजे या मार्गाचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीएने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर म्हणजे पीपीपी तत्वावर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

त्यानुसार या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाला पुणेरी मेट्रो म्हणून ओळखले जात आहे. हा प्रकल्प हिंजवडी केंद्राला शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगरला कनेक्ट करणार आहे.

त्यामुळे या प्रकल्पाला पुणेरी मेट्रो हे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन याआधीच पूर्ण झाले आहे. सध्या प्रकल्पासाठी मेट्रो मार्गांचे उभारणीचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले आहे. एकंदरीत या प्रकल्पाचे आतापर्यंत 45 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या 18 महिन्यात पूर्ण करण्याचा मानस आहे. मार्च 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले असून आता ठरवलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण होतो का याकडे पुणेकरांचे विशेष लक्ष राहणार आहे.