पुणे लोकलबाबत मोठा निर्णय ! वेळापत्रकात होणार ‘हा’ महत्वाचा बदल, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Local Train : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. वाढते नागरिकीकरण, औद्योगिकीकरण यामुळे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम म्हणून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. दरम्यान वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना प्रवासादरम्यान विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेच कारण आहे की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. यासोबतच पुणे लोकलचा देखील विस्तार करण्याचे नियोजन शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आखले जात आहे. सध्या स्थितीला पुणे शहरात पुणे ते लोणावळा या मार्गावर लोकल ट्रेन सुरू आहे. मात्र आता येत्या काही महिन्यात पुणे ते दौंड दरम्यान देखील इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सुरू करण्याचा मानस असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे पुणे ते दौंड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशातच आता पुणे ते लोणावळा दरम्यान सुरू असलेल्या लोकल बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे-लोणावळा आणि लोणावळा-पुणे लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात थोडासा बदल केला जाणार आहे. खरंतर सध्या स्थितीला पुणे ते लोणावळा लोकल ट्रेन दुपारच्या वेळी बंद ठेवली जाते.

मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दुपारी लोकल बंद असते. त्यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकल ऐवजी प्रवाशांना इतर पर्यायी प्रवासी साधनाने प्रवास करावा लागतोय. यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यान सुरू असलेली लोकल ट्रेन दुपारी देखील चालवली गेली पाहिजे अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे.

दरम्यान प्रवाशांच्या या मागणीवर आता सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. आता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे दरम्यान दुपारी देखील लोकलची एक फेरी चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला पुणे-लोणावळा लोकल सेवा सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते दुपारी तीन या काळात बंद ठेवली जात आहे.

तसेच लोणावळा-पुणे लोकल सेवा ही सकाळी १० ते दुपारी २ वाजून ५० मिनिटे या कालावधीत बंद ठेवली जात आहे. मात्र आता दुपारी देखील पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे या मार्गावर प्रत्येकी एक लोकल सेवा चालवली जाणार आहे. यामुळे आता दुपारी पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा