पुण्याहून ‘या’ शहरादरम्यान लवकरच सुरू होणार लोकल ट्रेन ! वाचा कसा असणार रूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Local Railway News : मुंबई आणि उपनगरात लोकलचे जाळे विस्तारण्याचे काम सूरु आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील वेगवेगळ्या मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. मुंबई लोकलने रोजाना लाखो मुंबईकर प्रवास करतात. दरम्यान मुंबईच्या धर्तीवरच आता पुणे शहरात देखील लोकलचा विस्तार करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

सध्या स्थितीला पुण्यात पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. मात्र आता लवकरच पुण्याहून आणखी एक लोकल ट्रेन चालवली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच पुणे ते दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरू केली जाणार आहे. येत्या काही दिवसात पुणे रेल्वे विभागाला दोन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट रेक मुंबई विभागाकडून मिळणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या रेकची येत्या काही दिवसात चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू होईल अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिली आहे. खरंतर पुणे ते दौंड रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

सध्या स्थितीला डेमू आणि मेमू या ट्रेननेच या मार्गावरील प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. म्हणून या मार्गावरील प्रवाशांच्या माध्यमातून जलद प्रवासासाठी लोकल सुरू करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान प्रवाशांची ही मागणी आता फळाला आली आहे. येत्या काही दिवसात पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे सेवा सुरू होणार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन महिन्यात या मार्गावर लोकल सेवा सुरू होऊ शकते. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला तर ही लोकल सेवापुढे वाढवली जाईल असा देखील विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.