Pune Job News : सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारे पुण्यात नोकरीं करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे बारावी पास असलेल्या आणि पुण्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सोने पे सुहागा अशी बाब राहणार आहे.
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी बारावी पास उमेदवारांसाठी पदभरती आयोजित झाली आहे. ऑफिस ऑपरेशन एक्झिक्यूटिव्ह अर्थातच बॅक ऑफिस या पदाच्या रिक्त जागा या बँकेत भरल्या जाणार आहेत. यासाठी ही पदभरती आयोजित झाली असून आज आपण या पदभरती संदर्भातील इत्यंभूत माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती जागांसाठी आहे ही पदभरती
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेत एकूण दोन ऑफिस ऑपरेशन एक्झिक्यूटिव्ह अर्थातच बॅक ऑफिस या पदाच्या जागांसाठी ही पदभरती असून लवकरात लवकर यासाठी अर्ज इच्छुकांनी करायचा आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पास आऊट झालेला बारावी पास उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे.
अर्ज कसा करायचा
आम्ही आपणास सांगू इच्छितो की इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पदभरती 2023 या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणतीच परीक्षा फी आकारली जाणार नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण कोणते
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
वेतन किती मिळणार
सात हजार रुपये ते 20 हजार रुपये प्रतिमहा एवढे वेतन राहणार आहे.