Pune Home : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे शहर म्हणजेच पुणे. या शहराला पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतात. शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून पुण्याची ओळख संपूर्ण जगात आहे.
येथे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस शहरात शिक्षणानिमित्त, उद्योगानिमित्त आणि रोजगारा निमित्त येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
जो कोणी पुण्यात पाय ठेवतो तो अस्सल पुणेकर बनूनच बाहेर पडतो. पुण्यात अनेकांना आपले स्वतःचे, हक्काचे घर बनवायचे असते. जो कोणी नव्याने पुण्यात दाखल होतो तो पुणे शहरात घर बनवण्याचे स्वप्न पाहतो.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून पुण्यात कोणत्या ठिकाणी घर बनवले पाहिजे असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याचबाबतचा प्रश्न पुणेकरांना विचारला असता त्यांनी भन्नाट उत्तरे दिली आहेत.
पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते याबाबत पुणेकरांनी आपापली मते मांडली आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म instagram वर केल्या काही दिवसांपासून एक रील वेगाने व्हायरल होत आहे.
या रील मध्ये पुण्यात घर घेण्यासाठी सर्वात योग्य ठिकाणी कोण कोणती असा प्रश्न पुणेकरांना विचारण्यात आला आहे. @maze.pune या instagram पेजवर हे रील पोस्ट करण्यात आले आहे.
या instagram पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या या रील वर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. यावर पुणेकरांनी काही भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
काय म्हटलेत पुणेकर ?
पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते ? असा प्रश्न या व्हिडिओमध्ये उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना पुणेकरांनी हिंजवडी, कर्वेनगर, खराडी, वाघोली, स्पाईन सिटी, बाणेर, कोरेगाव पार्क, वारजे, एफसी रोड, पिंपरी चिंचवड, आळंदी घाट, कोथरूड, हडपसर, केशवनगर मुंडवा, मोशी, मगरपट्टा, सिंहगड रोड, धायरी, एरंडवणे अशी काही नावे सुचवली आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी गमतीशीर प्रक्रिया देताना पुण्यातच का गर्दी करायची आहे पण प्रत्येकाला ? मोकळा श्वास पण घेता येईना अशी भन्नाट पुणेरी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
सध्या हा व्हिडिओ instagram वर वेगाने व्हायरल होत आहे. यावर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
https://www.instagram.com/reel/C3DF2LfNqro/?igsh=MzRlODBiNWFlZA==