Pune Goa Railway : नुकताच भारतात दिवाळीचा मोठा पावन पर्व साजरा झाला आहे. संपूर्ण देशाने मोठ्या आनंदात दिवाळी सण साजरा केला आहे. शिवाय आता येत्या काही दिवसात या चालू वर्षाची सांगता होणार आहे.
आता लोक या चालू वर्षाला निरोप देणार आहेत आणि नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सालाबादाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील नागरिक हजारोच्या संख्येने गोव्याला जाणार आहेत.
मुंबई आणि पुण्यामधूनही हजारो नागरिक नववर्षाच्या स्वागताला गोव्यात जाणार आहेत. यामुळे मुंबई ते गोवा आणि पुणे ते गोवा या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये डिसेंबर अखेरीस दरवर्षी मोठी गर्दी होत असते. यामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यावरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण पुण्यावरून नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या पुणेकरांसाठी चालवण्यात येणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते गोवा दरम्यान गाडी क्रमांक 01445 ही गाडी 22 आणि 29 जानेवारीला चालवली जाणार आहे. ही विशेष गाडी पुणे जंक्शन ते करमाळी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान चालवली जाईल.
ही गाडी पुण्यातील पुणे जंक्शन येथून सायंकाळी साडेपाच वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता करमाळी येथे पोहोचणार आहे.
तसेच गोवा ते पुणे दरम्यान गाडी क्रमांक 01446 ही गाडी 24 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला चालवली जाणार आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन करमाळी ते पुणे जंक्शन दरम्यान चालवली जाईल.
ही गाडी या निर्धारित कालावधीमध्ये करमाळी येथून सकाळी 9.20 वाजता सुटणार आहे आणि रात्री 11.35 वाजता पुणे जंक्शनला पोहोचणार आहे.
कुठे रहाणार थांबा
या गाडीला या रेल्वेमार्गवरील सर्वच महत्त्वाचे रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या महत्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास गर्दीच्या वेळेतही सुखकर होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.