Pune Expressway News : पुणे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. शहरात विविध शैक्षणिक संस्थान कार्यरत आहेत. यामुळे शिक्षणानिमित्त पुणे शहरात येणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात बस्तान बसवत आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील लाखो स्पर्धक शहरात दाखल होतात.
म्हणून पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अलीकडे तर शहरांमध्ये विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहराला आता आयटी हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. पण आयटी हब म्हणून अलीकडेच नावावर रूपाला आलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण झाले आहेत. हेच कारण आहे की पुणेकरांना वाहतूक कोंडी मधून दिलासा मिळावा म्हणून शहरात विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरात एकूण दोन रिंग रोड तयार होणार आहेत. एक रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळ तयार करणार आहे तर एक रिंग रोड पीएमआरडीए कडून तयार होणार आहे. यासोबतच शहरात मेट्रो देखील सुरु केली जात आहे. सध्या शहरात मेट्रोचे दोन मार्ग सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर सध्या मेट्रो सुरू आहे. येत्या काही दिवसात या मेट्रो मार्गांचा विस्तारित मार्ग देखील सुरू होणार आहे. यामुळे निश्चितच पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे. अशातच, आता पुणेकरांना आणखी 2 प्रकल्पांची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत बनवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुणे शहराला 35,000 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांची भेट दिली जाणार आहे.केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. गुरुवारी अर्थातच नऊ नोव्हेंबर 2023 रोजी नितीन गडकरी यांनी या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. स्वतः गडकरी यांनीच याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
कोणते आहेत हे प्रकल्प ?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील रस्ता, उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो चालवली जाणार आहे. हा प्रकल्प पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मोलाची भूमिका निभावणार आहे. दरम्यान या प्रकल्पाला नुकतीच गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. तसेच यासाठी वीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय, पुणे ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान एक नवीन रस्ता तयार केला जाणार आहे. या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. या महामार्गाला देखील गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते मंजुरी देण्यात आली आहे. हा महामार्ग चाकण, तळेगावमार्गे जाणार आहे. राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केले आहे.
या मंडळामार्फत हा महामार्ग तयार केला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि गतिमान होणार आहे. खरंतर, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
दररोज मराठवाडा ते पुणे आणि पुणे ते मराठवाडा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता शासनाने पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी नवीन महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याच नवीन महामार्गाला आता नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे या नवीन महामार्गाचे काम येत्या काही दिवसात प्रत्यक्षात सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.