Pune Expressway News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामध्ये रस्ते प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात समावेश पाहायला मिळतोय. वाहतूक सुधारण्यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. अशातच, आता महाराष्ट्र राज्य शासनाने आणखी एका महत्त्वाच्या महामार्गाला मंजुरी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते नाशिक दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या औद्योगिक महामार्गाला आता राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.कसा असणार रूट
हा मार्ग 213 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा मार्ग नासिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याला परस्परांसोबत जोडणार आहे. खरे तर 2023 मध्ये या महामार्गाचा बृहत प्रकल्प आराखडा अर्थातच डीपीआर तयार करण्यासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.ही कंपनी सध्या स्थितीला या मार्गाचा डीपीआर तयार करत आहे. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गाच्या फायनल अलाइनमेंटचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. याच प्रस्तावाला राज्य शासनाने आता मंजुरी दिली आहे.हा मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या शहरातून जाणार आहे.या महामार्ग अंतर्गत पुणे ते शिर्डी १३५ किलोमीटर, सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्गाचा शिर्डी इंटरचेंज ते नाशिक – निफाड इंटरचेंज हा साधारण लांबी ६० किलोमीटरचा भाग व सुरत – चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक – निफाड राज्य महार्गाचा भाग) साधारण लांबी १८ किलोमीटर असा हा महामार्ग विकसित होणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी ही 213 किलोमीटर राहणार आहे.20 हजार कोटींचा खर्च
हा महामार्ग बांधून तयार करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला 20000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्या स्थितीला नाशिक ते पुणे असा प्रवास करण्यासाठी जवळपास पाच ते सहा तासांचा कालावधी प्रवाशांना खर्च करावा लागत आहे. मात्र हा औद्योगिक महामार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास फक्त आणि फक्त दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.यामुळे पुणे, अहमदनगर आणि नासिक जिल्ह्यातील उद्योग कृषी शिक्षण पर्यटन अशा विविध क्षेत्राला मोठी उभारी मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. हा मार्ग राज्याची दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत बनवणार अशी आशा आहे.केव्हा सुरु होणार काम
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीस या महामार्गासाठीचे भूसंपादन पूर्ण होऊ शकते आणि नवीन वर्षात अर्थातच वर्ष 2025 मध्ये या महामार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. जर भूसंपादनात फारशा अडचणी आल्या नाहीत तर या वर्षाच्या शेवटी-शेवटी सुद्धा या मार्गाचे काम सुरू होऊ शकते.हा मार्ग समृद्धी महामार्ग आणि सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोरला जोडला जाणार आहे. यामुळे राज्यातील या तिन्ही जिल्ह्यांमधील औद्योगिक, कृषी अशा क्षेत्राला थेट फायदा मिळणार आहे.
Krushi Marathi
Read Latest Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi, Read Trending Stories Of कृषी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, राजकारण, हवामान, यशोगाथा विषयक माहिती मराठी भाषेत