Pune Expressway News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांना परस्परांशी कनेक्ट करण्यासाठी मोठमोठ्या महामार्गांची उभारणी केली जात आहे. यासाठी भारतमाला परियोजना राबवली जात आहे. या भारतमाला परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित केले जाणार आहे.
विशेष बाब अशी की, या परियोजनेअंतर्गत जे महामार्ग विकसित होणार आहेत ते सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. अशातच आता पुणेकरांना देखील एका ग्रीनफिल्ड महामार्गाची भेट मिळणार आहे. पुणे ते बेंगलोर दरम्यान हा ग्रीनफिल्ड महामार्ग विकसित केला जाणार आहे. सध्या स्थितीला पुणे ते बेंगलोर प्रवास करण्यासाठी सहा पदरी महामार्ग अस्तित्वात आहे.
हा महामार्ग ८४० किलोमीटर लांबीचा असून या मार्गाने प्रवास करण्यासाठी सद्यस्थितीला प्रवाशांना 15 ते 18 तासांचा कालावधी लागत आहे. पण या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी त्यांना जलद आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
यानुसार पुणे ते बेंगलोर दरम्यान ग्रीन फील्ड कॉरिडॉर विकसित केला जाणार असून या नवीन महामार्गाची लांबी 702 किलोमीटर आणि या नवीन मार्गाची रुंदी 100 मीटर एवढी राहणार आहे. या महामार्गामुळे पुणे ते बेंगलोर हा प्रवास फक्त सात तासात पूर्ण होणार आहे. म्हणजेच प्रवासांचा पाच ते आठ तासांपर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. दरम्यान आता आपण या महामार्ग विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार महामार्ग?
हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा राहणार आहे. खरंतर पुणे अलीकडे आयटी हब म्हणून वेगाने विकसित होत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बंगलोर शहराचा देखील वाटा मोठा खास आहे. यामुळे हा महामार्ग फक्त दोन राज्यांना जोडतो असं नाही तर या मार्गामुळे देशातील दोन आयटी हब परस्परांना कनेक्ट होणार आहेत.
हा मार्ग महाराष्ट्रातून पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. कर्नाटक मधील बेलारावी, बागलकोट, गडाख, विजयनगर, देवनगरी, चित्रदुर्गा, तुमकुर आणि बेंगलोर या जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. या महामार्गात 6 ओव्हर ब्रिज, 42 मुख्य पूल, बहात्तर बॉक्स टाईप पूल, 59 अंडरपास, 59 लहान अंडरपास, 45 ओवर पास, 45 रेगुलर ओव्हरपास आणि 35 इंटरचेंज राहणार आहेत.
या ग्रीन फील कॉरिडोरवर कॉलिंग बूथ, सीसीटीव्ही कॅमेरे, टोल प्लाजा अशा सर्व सोयी सुविधा राहणार आहेत. हा एक्सप्रेस वे बांधण्यासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. या एक्सप्रेस वे चे बांधकाम येत्या काही महिन्यात सुरू होईल आणि 2028 पर्यंत या महामार्गाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होईल असा दावा केला जात आहे.