Pune Bus News : महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. एसटी महामंडळाच्या लाल परीने प्रवास करण्याला सर्वाधिक पसंती मिळते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गावा-गावांमध्ये लाल परी पोहोचत असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे.
दरम्यान पुण्यातील एसटी प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर आगारातून एक नवीन बस सुरू करण्यात आली आहे.
वल्लभ नगर ते कर्नाटक येथील जमखंडी दरम्यान ही नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना कर्नाटकात जाणे सोयीचे होणार आहे.
विशेष म्हणजे या गाडीमुळे कर्नाटकातून पिंपरी चिंचवड मध्ये येणाऱ्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक कसे आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार वल्लभनगर आगारातून जमखंडी साठी तीन मे 2024 पासून एसटी महामंडळाची बस सुरू करण्यात आली आहे.
एसटी महामंडळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस दररोज सकाळी साडेदहा वाजता पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर बस आगारातून सुटणार आहे.
पुढे ही बस शिवाजीनगर, पुणे स्टेशन, स्वारगेट, मिरज मार्गे 358 किलोमीटर लांबीचा प्रवास करून रात्री सव्वाआठ वाजता कर्नाटक मधील जमखंडी येथे पोहोचणार आहे. ही गाडी जमखंडी येथे रात्री मुक्कामाला राहणार आहे.
मग सकाळी साडेसात वाजता जमखंडी येथून बस वल्लभनगरसाठी सोडली जाणार आहे. ही बस जमखंडी येथून रवाना झाल्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता वल्लभनगर येथे पोहोचणार आहे.