पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पीएमपीएलच्या बसमध्ये सुरू झाली ‘ही’ नवीन सुविधा, काय फायदा होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Breaking News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे शहरातील पीएमपीएलच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर पीएमपीएलच्या बसेस शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

या बसेसमुळे पुणेकरांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. ज्याप्रमाणे मुंबईमधील लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे पुणे शहरातील आणि उपनगरातील पीएमपीएलच्या बसेस शहराची लाईफ लाईन आहेत असे म्हणायला हरकत नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हेच कारण आहे की पी एम पी एल च्या बसेस मध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा देखील पुरवल्या जात आहेत. अशातच आता पी एम पी एल च्या बसेस मध्ये एक नवीन सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने सुरु केली आहे. या सुविधेमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

खरंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून पुणे शहरातील नागरिकांसाठी नवीन बसेस चालवल्या जात आहेत. सोबतच विना कंडक्टर बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. अशातच आता पुणे शहरातील नागरिकांसाठी पी एम पी एल ने आजपासून एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना आता खिशात कॅश उपलब्ध नसली तरी देखील प्रवास करता येणार आहे.

कारण की एक ऑक्टोबर पासून म्हणजेच आज रविवारपासून पीएमपीएलने कॅशलेस तिकिटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता पी एम पी एल च्या बस मध्ये ऑनलाईन पेमेंट द्वारे तिकीट काढता येणार आहे. ही सुविधा आज सकाळपासून सुरू झाली आहे. आता बसमधील प्रवाशांना यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून तिकीटाचे पैसे देता येतील आणि काढता येणार आहे.

गुगल पे, फोन पे यांसारख्या पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून हे तिकीट काढता येणे शक्य होणार आहे. यासाठी 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान बाणेरडे फोन अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी देखील घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आजपासून ही नवीन सुविधा शहरातील सर्वच बसेसमध्ये सुरू करण्यात आली आहे.