पुणेकरांची मागणी होणार पूर्ण ! दिवाळीनंतर ‘या’ नवीन मेट्रोमार्गाचे काम सुरु होणार, 3 वर्षात पूर्ण होणार 4 किलोमीटर लांबीचा मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Breaking News : पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर म्हणून हे शहर संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. पुणे शहरात विविध शैक्षणिक संस्थान कार्यरत आहेत. यामुळे शिक्षणासाठी येथे राज्यासहित संपूर्ण देशभरातील विद्यार्थी येथे येतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देखील शहरात लाखोंच्या संख्येने स्पर्धक दाखल होतात.

अनेकजण शिक्षणासाठी शहरात येतात आणि शहरातच नोकरी शोधतात. अलीकडे शहराला आयटी हब म्हणून देखील ओळख प्राप्त झाली आहे. विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान शहरात बसवले आहे. यामुळे शिक्षणासाठी आणि कामानिमित्त शहरात स्थायिक होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे शहरातील लोकसंख्या गेल्या काही दशकांमध्ये विक्रमी वाढली आहे. पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड शहरातही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वधारली आहे. पण यामुळे सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. हेच कारण आहे की, शहरातील सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

या ठिकाणी आता राजधानी मुंबई प्रमाणेच मेट्रो मार्ग विकसित केले जात आहेत. सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर मेट्रो सुरू आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मेट्रो मार्गाचा स्वारगेट पर्यंत आणि वनाज ते रुबी हौल क्लिनिक या मेट्रो मार्गाचा रामवाडी पर्यंत विस्तार केला जाणार आहे.

सध्या स्थितीला या दोन्ही मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यापैकी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतच्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावर डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट याचा विस्तारित मार्ग अर्थातच सिविल कोर्ट ते स्वारगेट एप्रिल 2024 पर्यंत सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी पर्यंतच्या मेट्रो मार्गाला केंद्र शासनाच्या माध्यमातून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. खरतर या मार्गाचा डीपीआर पुणे मेट्रोकडून तयार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या मार्गाला मान्यता दिली. नंतर या मार्गाचा प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला.

मध्यंतरी या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली. परंतु केंद्र शासनाची या प्रकल्पाला मान्यता मिळालेली नव्हती. दिल्ली दरबारी हा प्रकल्प जवळपास दोन वर्षे पडून होता. मात्र आता या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 23 ऑक्टोबर रोजी या प्रकल्पास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

यामुळे आता या मार्गाचे येत्या तीन ते चार महिन्यात काम सुरू होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 4.414 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग तयार होणार आहे. या मेट्रो मार्गावर चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलीस ठाणे, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती शक्ती शिल्प चौक असे तीन महत्त्वाचे स्टेशन राहणार आहेत.

या मार्गासाठी जवळपास 910 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प तीन वर्ष आणि तीन महिन्यांच्या काळात पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे भाग मेट्रो ने जोडले जाणार असून या परिसरातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

त्यामुळे या भागातील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे. या भागातील नागरिकांचा प्रवास यामुळे आरामदायी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. सदर प्रकल्पामुळे या भागातील लाखो लोकांना फायदा मिळणार आहे. या मार्गामुळे निगडीवरून थेट स्वारगेटपर्यंत मेट्रोने जाता येईल असे चित्र तयार होत आहे.