Pune Bengaluru National Highway : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक महामार्गांची कामे केली जात आहेत. तसेच काही महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत.
पुणे ते बेंगलोर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम देखील सद्य-स्थितीला सुरू आहे. हे काम राष्ट्रीय महामार्गाचे असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याचे काम करत आहे.
खरेतर या नॅशनल हायवेचे कागल ते सातारा यादरम्यानच्या 133 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सहा पदरीकरणचे काम प्रगतीपथावर आहे.
दरम्यान यापैकी वारणा नदी ते कागल या 29 किलोमीटर लांबीच्या मार्गावर काही ठिकाणी मोठे बोगदे आणि काही ठिकाणच्या मार्गात बदल केला जाणार आहे.
दरम्यान, आता आपण या मार्गावर कोणत्या ठिकाणी बोगदे विकसित होणार आहेत ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठं तयार होणार नवीन बोगदे ?
मिळालेल्या माहितीनुसार, या राष्ट्रीय महामार्गावर मंगरायाचीवाडी, मेनन पिस्टन, नागाव फाटा, सांगली फाटा, याठिकाणी मोठे बोगदे विकसित होणार आहे. या सदर भागात २५ मीटर लांबीचे बोगदे तयार केले जाणार आहेत.
तसेच उचगाव, उजळाईवाडी, कणेरीवाडी याठिकाणी देखील बोगदे तयार होणार आहे. येथे २० मीटर लांबीचे बोगदे तयार करणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. या बोगद्यांमुळे या मार्गावरील वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक जलद होईल असे बोलले जात आहे.
खरे तर, पुणे ते बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे सध्याचा रस्ता हा अपुरा पडत आहे. वाढती वाहनांची संख्या पाहता या रस्त्याचे सहा पदरीकरण करणे आवश्यक होते.
त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे कागल ते सातारा असा 133 किलोमीटर लांबीचा मार्ग सहा पदरी केला जात आहे. त्याचे काम सध्या स्थितीला युद्ध पातळीवर सुरू असून लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे.