Pune Bangalore Highway : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच Indian Economy जगातील तिसरी सर्वात मोठी इकॉनोमी बनेल असा आशावाद तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
यामुळे भारतात सध्या विविध विकास प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांचा देखील समावेश होतो. सध्या देशात विविध महामार्गाची कामे सुरू आहेत.
भारतमाला परीयोजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जात आहेत. विशेष म्हणजे या परियोजनेअंतर्गत तयार होणारे सर्व महामार्ग ग्रीन फील्ड कॉरिडोर आहेत.
या अंतर्गत पुणे ते बेंगलोर दरम्यान ग्रीन फील्ड हायवे विकसित होत आहे. दरम्यान, याच ग्रीन फील्ड कॉरिडोर संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे ते बेंगलोर दरम्यान तयार होणारा ग्रीन फील्ड हायवे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या योगेवाडी एमआयडीसीला जोडला जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील विकास सुनिश्चित होईल अशी आशा आहे.
खरे तर, हा प्रस्तावित महामार्ग प्रस्तावित करण्यात आलेल्या योगेवाडी एमआयडीसी पासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावरून जात आहे. या एमआयडीसीचे काम येत्या काही दिवसात प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत हा ग्रीन फील्ड कॉरिडोर या एमआयडीसीला जोडला गेला पाहिजे अशी मागणी केली जात होती. या मागणीबाबतचे आमदार सुमनताई पाटील यांचे पत्र राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.
दरम्यान, या भेटीत नितीन गडकरी यांनी हा प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड हायवे योगेवाडी एमआयडीसीला जोडला जाईल अशी ग्वाही दिली आहे. या संदर्भात लवकरच संबंधितांना निर्देश दिले जातील असे देखील त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यासहित परिसरातील विकासाला मोठा हातभार लागणार आहे. पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड महामार्ग जर योगेवाडी एमआयडीसी ला जोडला गेला तर एमआयडीसीच्या विकासाला हातभार लागणार आहे.
परिणामी या परिसरातील कृषी, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा विविध घटकांना मोठी उभारी मिळणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.