Pune Bangalore Highway : पुणे बंगळूर महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आलं आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या महामार्गचे सतरा वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले होते. तदनंतर या महामार्गात कोणताच बदल झालेला नव्हता.
यामुळे 2018 मध्ये या महामार्गातील सातारा ते कागल या 133 किलोमीटर अंतराच्या सहा पदरीकरणास मंजुरी मिळाली. सातारा ते कागल हे काम एकूण दोन विभागात विभागुन केलं जाणार आहे. शेंद्रे ते पेठ नाका आणि पेठ नाका ते कागल अशा दोन विभागात हे काम होणार असून दोन्ही विभागांसाठी वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आले आहेत. यासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत.
मात्र प्रत्यक्षात काम सुरू होण्यास चार वर्षाचा कालावधी लागला आहे. दरम्यान आता सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते कानेगाव या ठिकाणी या महामार्गाच्या सहापदरीकरणाला सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष सपाटीकरणाला सुरुवात झाली असल्याने अखेर या महामार्गाच्या सहापदरीकरणाला मुहूर्त सापडला असल्याच्या भावना आता स्थानिकांमधून समोर येऊ लागल्या आहेत.
आता रस्त्यामध्ये येणारे अतिक्रमणे आणि झाडेझुडपे काढण्याचे काम सुरू आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, हा महामार्ग ज्यावेळी चौपदरीकरण केला गेला त्यावेळीच सहापदरीकरणास आवश्यक एवढी जागा भूसंपादित करून ठेवण्यात आली होती. त्यावेळी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देखील मिळालेला आहे.
मात्र अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी अधिग्रहित जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या घटना आता उघडकीस येऊ लागले आहेत. त्यामुळे आता अशा लोकांचे अतिक्रमण काढले जात आहे. म्हणजे आता या महामार्गाच्या सहापदरीकरणास सुरुवात केली जात आहे.
दरम्यान या महामार्गालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना सेवा रस्ता उपलब्ध नाही यामुळे त्यांना त्यांचा शेतमाल वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था केली जावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.