Property Rule : प्रत्येक जण आपल्या कष्टातून पुढच्या पिढीसाठी मालमत्ता किंवा संपत्ती तयार करत असतो. काही लोकांना वारसा हक्काने मोठी मालमत्ता प्राप्त होते. म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता मिळते. या मालमत्ते विषयी मात्र लोकांमध्ये फारशी जागरूकता पाहायला मिळत नाही.
अनेकदा माहितीच्या अभावामुळे मालमत्तेवरून मोठे वाद विवाद पाहायला मिळतात. प्रामुख्याने भावंडांमध्ये जमिनीच्या प्रकरणावरून किंवा संपत्तीवरून कायमच वादविवाद पाहायला मिळाले आहेत.
भाऊ आणि बहिणीत मालमत्तेवरून मोठे वाद-विवाद होतात. अशा परिस्थितीत आज आपण मुलींना वडिलांच्या संपत्तीत किती हिस्सा मिळतो, वडिलांच्या संपत्तीत मुलींना केव्हा हिस्सा मिळत नाही याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
मुलींना मिळतो समान अधिकार
हिंदू वारसा कायदा 1956 अन्वये मुलींना 2005 पर्यंत लग्न होईपर्यंत केवळ हिंदू अविभक्त कुटुंबाचा सदस्य मानले जात असे. मात्र 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली आणि मुलींना देखील मुलांप्रमाणेच वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजेच आता मुलीचे लग्न झाले तरी देखील वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार बदलत नाही. लग्नानंतरही मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत हक्क मिळतो. 2005 पूर्वी मुलींना केवळ अविभक्त हिंदू कुटुंबाचे सदस्य मानले जात असे.
मुलींना केव्हा अधिकार मिळत नाही
जर वडिलांनी स्वतःच्या पैशातून संपत्तीची खरेदी केलेली असेल अर्थातच जर वडिलांनी स्वतः संपत्ती कमावलेली असेल तर मुलींचा अशा संपत्तीत वाटा नसतो. म्हणजेच मुलींचा वडिलांच्या स्वअर्जित संपत्तीत वाटा नसतो. वडील स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती मुलीला देऊ शकतात अन्यथा अशी संपत्ती देण्यास नकारही दाखवू शकतात.
अशा प्रकरणात मुली मात्र न्यायालयात जाऊ शकत नाहीत. म्हणजेच मुलींचा वडीलोपार्जीत संपत्तीत मुलांप्रमाणे समान अधिकार असतो मात्र स्वकष्टार्जित संपत्तीत त्यांना वाटा मागता येत नाही. अशी स्वअर्जित संपत्ती वडील आपल्या खुशीने मुलीला देऊ शकतात अन्यथा संपत्ती देण्यास नकार दाखवू शकतात.