Property Rights Marathi : आपल्या देशात संपत्तीवरून मोठे वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीच्या अधिकारावरून कुटुंबात विविध वाद विवाद होतात. कित्येकदा तर संपत्तीच्या अधिकारांवरून कुटुंबांमध्ये भांडण देखील होते. मग अशावेळी हे संपत्तीवरील वादविवाद न्यायालयात पोहोचतात.
मग न्यायालय अशा प्रकरणांमध्ये सुनावणी घेते आणि योग्य व्यक्तींना संपत्तीचा अधिकार बहाल केला जातो. भारतात संपत्तीसाठी कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्याच्या अधीन राहून लोकांना कुटुंबातील संपत्तीत अधिकार प्रदान केला जातो.
मात्र असे असले तरी सर्वसामान्य लोकांना संपत्तीच्या कायद्याबाबत फारशी माहिती नसते. यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आज आपण संपत्तीबाबत भारतीय कायद्याने भारतीय नागरिकांना दिलेल्या एका अधिकाराची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण दुसऱ्या पत्नीला पतीच्या मालमत्तेत किंवा संपत्तीत किती अधिकार मिळतो? दुसरी पत्नी आपल्या पतीच्या संपत्तीवर दावा करू शकते का? या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसऱ्या पत्नीला पतीच्या मालमत्तेत मिळणाऱ्या अधिकाराबाबत तज्ञ लोकांनी दिलेली माहिती आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
दुसऱ्या पत्नीला पतीच्या संपत्तीत वाटा मिळतो का? तर नाही. दुसऱ्या पत्नीला पतीच्या संपत्तीत कोणताच अधिकार नसतो. आता आपण दुसऱ्या पत्नीची कायद्याने केलेली व्याख्या समजून घेऊया. भारतीय कायद्यानुसार जर पतीने पहिली पत्नी हयात असताना किंवा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतलेला नसेल किंवा पहिल्या पत्नीने संन्यास घेतलेला नसेल तर अशा परिस्थितीत पत्नीने दुसरे लग्न केले तर त्या महिलेला दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळतो.
अशावेळी या दुसऱ्या पत्नीला पतीच्या संपत्तीत वाटा मिळत नाही. पण जर पहिल्या पत्नीचे निधन झाले असेल आणि त्यानंतर पतीने पुन्हा दुसरे लग्न केले असेल तर अशावेळी दुसऱ्या पत्नीला देखील पतीच्या संपत्तीत पूर्ण अधिकार असतो.
अशावेळी दुसऱ्या पत्नीला आपल्या पतीच्या संपत्तीत अधिकार मागता येतो. यासाठी दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीचा मृत्यूचा दाखला आणि तिच्या लग्नाचा दाखला पुरावा म्हणून वापरता येतो. तथापि अशा प्रकरणांमध्ये कायदे तज्ञ लोकांचा सल्ला आवश्यक आहे. अशा प्रकरणात वकिलांची मदत घेणे आवश्यक आहे.