Property Rights : भारतीय कायद्याने महिलांना विविध अधिकार दिले आहेत. प्रॉपर्टी विषयी म्हणजेच संपत्ती विषयी देखील महिलांना काही अधिकार दिले आहेत. खरंतर भारतीय कायद्याने संपत्ती विषयक विविध तरतुदी केलेल्या आहेत.
मात्र संपत्तीबाबत तयार करण्यात आलेल्या कायद्याची नागरिकांना अपेक्षित अशी माहिती नसते. अशा परिस्थितीत संपत्ती विषयक अनेक वादविवाद आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. संपत्तीबाबत असलेल्या कायद्याच्या तरतुदीत सर्वसामान्यांना ज्ञात नसल्याने प्रामुख्याने वादविवाद होतात. पण जर व्यक्तीला कायद्याने त्याला संपत्तीबाबत कोणकोणत्या अधिकार दिले आहेत याविषयी जर माहिती असेल तर असे वाद-विवाद बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.
दरम्यान आज आपण संपत्तीबाबत असलेल्या एका महत्त्वाच्या बाबी विषयी चर्चा करणार आहोत. आज आपण कुटुंबातील महिलेला असलेले अधिकार समजून घेणार आहोत. एक महिला मुलगी, पत्नी आणि सून देखील असते.
अशा परिस्थितीत आज आपण महिलेला तिच्या कुटुंबातील संपत्तीत किती अधिकार मिळतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर, काही लोकांकडून सातत्याने सुनेला तिच्या सासरच्या संपत्तीवर अधिकार असतो का, पत्नीला तिच्या पतीच्या संपत्तीवर किती अधिकार असतो असे प्रश्न उपस्थित केले जात होते. यामुळे आज आपण याच दोन बाबींविषयी सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुनेला सासरच्या संपत्तीवर किती अधिकार असतो?
भारतीय कायद्यानुसार, ज्याप्रमाणे पती त्याच्या नावावर असलेली संपत्ती पत्नीच्या सल्याशिवाय व परवानगी न घेता विकू शकतो त्याचप्रमाणे पत्नी देखील तिच्या नावावर असलेली संपत्ती पतीच्या सल्ल्याशिवाय व परवानगी विना विकू शकते.
सुनेला सासरच्या संपत्तीवर किती अधिकार असतो ? याबाबत हिंदू वारसा कायदा मध्ये तरतूद करून देण्यात आली आहे. हिंदू वारसा कायद्याच्या कलम आठ अनुसार एखाद्या महिलेला सासू-सासरे आणि पती हयात असेपर्यंत सासरच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही.
परंतु पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला पतीच्या हिस्साची संपूर्ण हिस्सेदारी मिळते. जीं संपत्ती पतीच्या नावावर असते ती पतीच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर होते किंवा अशा संपत्तीवर तिचा संपूर्ण अधिकार असतो.