काय सांगता ! करोडो रुपये देऊनही ‘या’ राज्यात खरेदी करता येणार नाही शेतजमीन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Rights : शेती कसण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते. जमिनीविना शेती करणे शक्य नाही. मात्र दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने शेतकऱ्यांकडे जमिनीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळेही शेत जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे.

अशा परिस्थितीत जगावर अन्नधान्य उत्पादनाचे मोठे संकट आगामी काळात उभे राहणार असा अंदाज आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडे शेतीचे क्षेत्र कमी असल्याने आता अनेक शेतकरी बांधव शेतजमीन खरेदी करू इच्छित आहेत. शिवाय काहीजण गुंतवणुकीसाठी शेत जमीन खरेदी करत आहेत.

यामुळे जमिनीचे भाव देखील आता करोडोच्या घरात पोहोचले आहेत. मात्र, भारतात असेही काही राज्य आहेत जिथे करोडो रुपये देऊनही शेतीची जमीन खरेदी करता येत नाही. आज आपण अशाच 2 राज्यांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेश हे देशातील एक थंड हवामानाचे ठिकाण आहे. या राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण येथे बाहेरील लोकांना शेत जमिनीची खरेदी करण्याची परवानगी दिलेली नाही. या डोंगराळ प्रदेशात मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी दिलेली नाही.

1972 च्या जमीन कायद्याचे कलम 118 लागू झाल्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश भाडेकरार आणि जमीन सुधारणा कायद्याच्या कलम 118 नुसार, कोणताही बिगर शेतकरी किंवा बाहेरील राज्यातील रहिवासी शेतकरी हिमाचल प्रदेशमध्ये शेतजमीन खरेदी करू शकत नाही.

एवढेच नाही तर स्थानिक लोक इच्छापत्राद्वारेही बाहेरील राज्यातील लोकांना जमीन हस्तांतरित करू शकत नाहीत. मात्र हिमाचल प्रदेश मध्ये शेतजमीन खरेदी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर काही लोकांना जमीन खरेदीची परवानगी मिळू शकते.

सिक्कीम : हे देखील भारतातील असे एक राज्य आहे जिथे फक्त त्याच राज्यातील रहिवाशी शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करता येते. सिक्कीम मधील लोकच येथे जमीन खरेदी आणि विक्री करू शकतात. हे नियम संविधानानेच घालून दिलेले आहेत.

राज्यघटनेचे कलम ३७१ एफ ने सिक्कीमला विशेषाधिकार प्राप्त झाले आहेत. या विशेष अधिकारानुसार सिक्किम राज्यात बाहेरील राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येत नाही.

राज्यघटनेनुसार, सिक्कीममधील शेतजमीन किंवा मालमत्ता बाहेरील लोकांना विकण्यास आणि खरेदी करण्यास मनाई आहे. सिक्कीममध्ये केवळ स्थानिक लोकांनाच स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी आहे.

त्याच वेळी, आदिवासी भागात केवळ सिक्कीमचे आदिवासीच स्थावर मालमत्ता खरेदी करू शकतात. तथापि, या राज्यात विकासाला चालना मिळावी म्हणून औद्योगिक इमारत बांधकामासाठी बाहेरील व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकतात.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा