Property News :. भारतात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. पण वाढत्या लोकसंख्येमुळे शेतकऱ्यांकडील शेतीजमीन सातत्याने कमी होत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने शहरीकरण आणि औद्योगिकीकरण देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे आता शेतीची जमीन कमी झाली आहे. अशा परिस्थितीत आता अनेक शेतकरी बांधव शेतीसाठी नव्याने जमीन खरेदी करत आहेत.
तसेच काही लोक गुंतवणुकीसाठी देखील शेत जमीन खरेदी करू लागले आहेत. आजकाल लोक गुंतवणुकीसाठी शेतीजमीन खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोने खरेदी किंवा शेतीयोग्य जमीन खरेदी करणे हा तुमच्यासाठी योग्य फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
जर तुम्ही लागवडीयोग्य जमीन खरेदी केली तर ती तुम्हाला नंतर चांगला परतावा देऊ शकते असे मत रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. शेतजमीनीत गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी होते. शेत जमिनीतील गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये निश्चितच चांगला परतावा देऊ शकते.
तथापि भारतात एक व्यक्ती किती शेतजमिनी खरेदी करू शकतो हा महत्त्वाचा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर भारतात शेतजमीन खरेदीचे नियम राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत.
यामुळे विविध घटक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतजमीन खरेदीचे वेगवेगळे नियम आहेत. दरम्यान आज आपण देशातील काही प्रमुख राज्यांमधील शेतजमीन खरेदीचे नियम जाणून घेणार आहोत.. देशातील या संबंधित राज्यांमध्ये एक व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकतो याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
भारतात जमीन खरेदी करण्याबाबत प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. अनेक राज्यांनी जमीन खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत. मात्र बिगरशेती जमिनीबाबत असा कोणताही नियम नाही. केरळ राज्याबद्दल बोलायचे झाले तर जमीन दुरुस्ती कायदा 1963 नुसार या राज्यात अविवाहित व्यक्ती केवळ 7.5 एकर जमीन खरेदी करू शकया नियमानुसार, पाच सदस्यांचे कुटुंब केवळ 15 एकर जमीन खरेदी करू शकते.
तसेच आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात शेतीयोग्य जमीन खरेदी करण्याचा नियम खूपच खास आहे. आपल्या राज्यात केवळ शेतकरीच जमीन खरेदी करू शकतो. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या नावावर आधीच शेतजमीन आहे असाच व्यक्ती आपल्या राज्यात शेतजमीन खरेदी करण्यास पात्र राहतो.
त्या व्यक्तीच्या नावावर आधीपासूनच सातबारा असतो अशाच व्यक्तीला आपल्या राज्यात जमीन खरेदी करण्याचा अधिकार राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. म्हणजे जो स्वतः शेती करतो तोच शेतीयोग्य जमीन खरेदी करू शकतो. विशेष म्हणजे आपल्या राज्यात एक व्यक्ती केवळ 54 एकर पर्यंतची शेतजमीन खरेदी करू शकतो.
एका व्यक्तीला यापेक्षा अधिक शेतजमीन आपल्या राज्यात खरेदी करता येत नाही. कर्नाटक राज्यात केला आपल्या महाराष्ट्रासारखेच नियम आहेत. कर्नाटकात एक व्यक्ती फक्त ५४ एकर जमीन खरेदी करू शकतो. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये शेतजमीन खरेदी करण्याची मर्यादा ३२ एकर आहे. म्हणजे हिमाचल प्रदेश राज्यात एक व्यक्ती 32 एकर जमीन खरेदी करण्यास पात्र राहतो.
याशिवाय, पश्चिम बंगाल सरकारने शेतजमीन खरेदीसाठी 24.5 एकरची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. उत्तर प्रदेश राज्यात एक व्यक्ती फक्त साडेबारा एकर जमीन खरेदी करण्यास पात्र राहणार आहे. येथे कोणीही 12.5 एकरपेक्षा जास्त लागवडीयोग्य जमीन खरेदी करू शकत नाही. याशिवाय गुजरात राज्यात केवळ शेतकरीच शेतीयोग्य जमीन खरेदी करू शकतो असा नियम आहे.