krushimarathi: कापसाच्या लागवडीवरुन कापसाच्या उत्पादन किती होईल याचा अंदाज बांधला जातो.तर ह्यासाठी उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने कापसाची विक्री करावी की साठवणूक शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
भारताचा कापूस उत्पादनात जगात पहिल्या क्रमांक लागतो.पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्री साठवणूक याबाबत आडचणी निर्माण होत आहे.
तर उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने यंदाच्या वर्षी उत्पादन घटून देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. कापसाच्या दरातील चढ-उतार याबाबत शेतकऱ्यांना माहिती होत नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या विक्री बद्दल कोणताही अंदाज बांधता येत नाही.
कापूस उत्पादनाचे क्षेत्र समोर आले की त्यानुसार उत्पादकता ठरवली जाते.यंदा कापूस काढणीच्या अंतिम टप्प्यात बोंडअळी आणि बोंडसडचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळेही उत्पादनात घट झाली होती. त्यामुळेच दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली.
पण दर वाढ होण्याच्या आगोदरच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली असल्यामुळे दरवाढीचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना घेता आला नाही.हेच जर सक्षम उत्पादकता ठरवण्यात आली असती.तर शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून भविष्यात होणाऱ्या दरवाढीचा फायदा त्यांना घेता आला असता.