Poultry Farming : मित्रांनो पोल्ट्री व्यवसायात सक्रिय असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो आता पोल्ट्री सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना काही परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत. निश्चितच आता पोल्ट्री सुरू करण्यासाठी शेतकरी बांधवांना अधिक श्रम घ्यावे लागणार आहेत.
पोल्ट्री सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची तसेच सरकारची परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. जे शेतकरी बांधव 5 हजाराहून अधिक पक्षांचे पोल्ट्री फार्म उभारू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही परवानगी बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजचा राहून अधिक पक्षाचे पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
मित्रांनो याबाबत अधिक माहिती अशी की , गौरी माऊलीखी यांनी यासंदर्भात हरित लवादामध्ये एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हरित लावादामध्ये सुनावणी झाली आहे. सदर सुनावणी मध्ये पाच हजाराहून अधिक पक्षीचे पोल्ट्री फार्म सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना प्रदूषण बोर्डाकडून परवानगी घेण्याचे सुचित करण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पोल्ट्री व्यवसायाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रदूषण बोर्डाकडून पोल्ट्री व्यवसाय उभारण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे शिवाय यासाठी काही अटी देखील लावून दिल्या आहेत. आता पोल्ट्री उभारणी करण्यासाठी या सदर अटींच्या अधीन राहून काम करावे लागणार आहे. मित्रांनो आता कुक्कुटपालन व्यवसाय किंवा पोल्ट्री फार्म लोकवस्ती पासून जवळपास 500 मीटर अंतरावर उभारावर लागणार आहे. तसेच पोल्ट्री फार्म नदी नाल्यांपासून दूर असावा.
राष्ट्रीय महामार्ग किंवा मुख्य रस्त्यापासून पोल्ट्री फार्म हा 100 मीटर मध्ये करावा अशी देखील अट आता लावून देण्यात आली आहे. तसेच आता या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2023 पासून करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. निश्चितच आता पाच हजाराहून अधिक पक्षीचे पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी प्रदूषण बोर्डाची परवानगी तसेच वर नमूद केलेल्या अटींचे अनुसरण करणे महत्त्वाचे राहणार आहे. एकंदरीत यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना सुरुवातीला काही त्रास सहन करावा लागत असला तरी देखील याचे दुरगामी चांगले परिणाम पहावयास मिळणार आहेत.