Poultry Farming : भारतात शेती सोबतच अनेक शेतीपूरक व्यवसाय केले जात आहेत. राज्यातील ग्रामीण भागात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा पशूंचे संगोपन केले जाते. याशिवाय कुक्कुटपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.
शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने कुकूटपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कुक्कुटपालन व्यवसायात मोठे पोल्ट्री फार्म तयार करुन बॉयलर जातीच्या कोंबडीचे पालन केले जाते.
दुसरीकडे असेही काही शेतकरी आहेत जे छोट्याखानी गावरान कोंबड्यांचे पालन करतात. विशेष म्हणजे गावठी कोंबड्यांचे संगोपन करून शेतकऱ्यांना चांगली कमाई सुद्धा होत आहे.
गावठी कोंबड्याच्या अंड्याला आणि मांसाला बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे गावठी कोंबड्यांचे पालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
दरम्यान, आज आपण कोंबडीच्या अशा एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याचे संगोपन केल्यास शेतकऱ्यांना अधिकचे अंडी आणि मांस उत्पादन मिळवता येणार आहे.
या जातीच्या कोंबडी पासून मिळणार अधिकचे अंडी उत्पादन
आज आपण कोंबडीच्या रेनबो रुस्टर जातीची माहिती पाहणार आहोत. ही कोंबडीची एक प्रगत जात आहे. या जातीचे संगोपन प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी केले जाते.
या जातीच्या कोंबड्या अधिक अंडी देण्यास सक्षम आहेत. अंडी उत्पादनात तर ही जात फायदेशीर ठरतेच शिवाय या जातीच्या कोंबड्यांपासून अधिकचे मांस उत्पादन देखील मिळतं आहे.
या जातीच्या कोंबडीची पूर्ण वाढ झाली तर या कोंबडीचे वजन 2.6 किलोपर्यंत भरते. या जातीची कोंबडी एका वर्षात 120 अंडी देते. गावठी कोंबडी एका वर्षात 50 ते 60 अंडे देते मात्र ही कोंबडीची देशी जात एका वर्षात 120 अंडी देते.
यामुळे जे शेतकरी बांधव गावठी कोंबड्यांचे पालन करतात त्यांनी जर या जातीच्या कोंबडीचे संगोपन केले तर त्यांना यातून चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.
दुसरीकडे वनराजा ही देखील कोंबडी अंडी उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. या जातीच्या कोंबडी पासून एका वर्षात 150 अंड्यांचे उत्पादन मिळू शकते.