डाळिंबाला आलेत अच्छे दिन ! सोलापूरच्या शेतकऱ्याने 50 टन डाळिंब विक्रीतून कमावलेत 70 लाख, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pomegranate Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये मोठा बदल झाला आहे. पूर्वी शेतकरी बांधव फक्त पारंपारिक पिकांची लागवड करत. अलीकडे मात्र शेतकऱ्यांनी नगदी पिकांची शेती सुरू केली आहे. फळबाग लागवड, फुल शेतीकडे शेतकरी वळू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून आता त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना आता लाखोंची कमाई होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील डाळिंब लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. खरतर फळबाग लागवड जेवढी फायद्याची तेवढीच तोट्याची देखील आहे. कारण की, फळबाग लागवडीसाठी लाखो रुपयांचा उत्पादन खर्च करावा लागतो.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा स्थितीत जर निसर्गाने साथ दिली नाही आणि बाजारात मालाला चांगला भाव मिळाला नाही तर लाखो रुपयांचा तोटा देखील फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पण जर योग्य बाजारभाव मिळाला तर फळबाग लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. आपल्या राज्यात डाळिंब, द्राक्षसह विविध फळ पिकांची लागवड होते.

त्यात डाळिंबाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. डाळिंबाचे उत्पादन पुणे, सोलापूर, नाशिकसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात घेतले जाते. येथील शेतकरी डाळिंब उत्पादनातून चांगले उत्पन्न देखील कमावत आहेत. सध्या डाळिंबाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने याची शेती आता शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर ठरत आहे.

माळशिरस तालुक्यातील जांभूळ गावातील अण्णा पाटील जांभूळ यांना देखील यंदा डाळिंबाची लागवड फायदेशीर ठरली आहे. बाजारातील चढ्यादराचा यावर्षी अण्णा पाटलांना फायदा झाला आहे. पाटलांना आत्तापर्यंत 1800 डाळिंब झाडांमधून तब्बल 40 ते 50 टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले असून आतापर्यंत त्यांना 70 लाखांची कमाई झाली आहे.

त्यांच्या डाळिंबाला बाजारात 170 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. अण्णा पाटील यांचा हा डाळिंब बांगलादेशात विक्रीसाठी पाठवला जात आहे. विशेष बाब अशी की, आणखी पंधराशे झाडांवरती माल राहिला आहे. पंधराशे झाडांमधूनही त्यांना एक कोटी रुपयांपर्यंतची कमाई होण्याची अशी.

अण्णा पाटील यांच्याकडे 3000 डाळिंबाची झाडे असून यांच्या देखभालीसाठी त्यांना यंदा साडेचार लाख रुपयांचा खर्च आला आहे. याचाच अर्थ पाटील यांनी कमी खर्चात डाळिंबाच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळवले आहे.